News18 Lokmat

नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबईत पाणी साचलं की भाजप टीका करते आता नागपूरात पाणी साचलं त्याला जबाबदार कोण असा सवाल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2018 04:21 PM IST

नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं? शिवसेनेचा भाजपला सवाल

नागपूर,ता.6 जुलै : मुंबईत पाणी साचलं की भाजप टीका करते आता नागपूरात पाणी साचलं त्याला जबाबदार कोण असा सवाल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केला आहे. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळं जनजिवन विस्कळीत झालं. ही संधी साधत शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडलंय. नागपूर महापालिकेत भाजपची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. नागपूरचा विकास केला, नागपूर स्मार्ट सीटी आहे असा दावा भाजप नेहमी करत असतं त्यामुळं शिवसेनेनं भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. हा सगळा स्मार्टनेस पाण्यात वाहून गेला अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी

संत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो

मुंबईच्या तीनही भागाला समुद्र आहे. भौगौलिक परिस्थितीही प्रतिकुल आहे, भरती ओहोटीमुळं पाणी आत येतं असतं असं असतानाही पावसाच्या पाण्याचा काही तासातच निचरा होता. नागपूरातमात्र पाण्याचा निचरा होत नाही हेच आहे का तुमचं प्रशासन असा सवालही रविंद्र वायकर यांनी केला.

मेट्रोच्या कामामुळंही अनेक ठिकानी पाणी साचलं आहे. नाल्यांच्या स्वच्छतेची कामही योग्य पद्धतीने होत नसल्याने अनेक भागात पाणी तुंबल आणि रस्ते जलमय झाले होते.

Loading...

नागपुरात मुसळधार, विधान भवनात लावला जनरेटर, कामकाज रद्द

रितेश देशमुख-रवी जाधवचे रायगडावरचे वादग्रस्त फोटो व्हायरल, शिवप्रेमींची टीका

विधानभवन परिसरातल्या तळमजल्यावर पाणी साचल्याने वीज बंद करावी लागली. त्यामुळं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्यावरूनही विरोधकांनी सरकार कोंडीत पकडलं. मुसळधार पावसात कामकाज वाहून गेल्याची चर्चा मात्र आमदारांमध्ये होती.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...