'या' राजकीय नेत्यांकडून एअर स्ट्राईकच्या पुराव्याची मागणी

भारतीय हवाई दलानं पाकच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्याचा खात्मा केला. पण, त्यावरून देखील आता राजकारण सुरू झालं आहे. काही राजकारण्यांनी तर पुरावे मागितले. दरम्यान, हे काम सरकारचं असल्याचं उत्तर वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी दिलं आहे.

  • Share this:

पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले. तुम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करायचा होता? की झाडं उन्मळून टाकायची होती? असा सवाल केला आहे. हा एक चुनावी जुमला आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

पी. चिदंबरम यांनी 'भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आम्हाला शंका नाही. पण, 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं कुणी सांगितलं?' असा सवाल ट्विटवरून केला आहे.

माजी केंद्रीय कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी आंतरराष्ट्रीय मीडियाचा हवाला देत एअर स्ट्राईकनं दहशतवाद्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही असं म्हटलंय. तुम्ही दहशतवादाचं राजकारण करताय का? असं ट्विट केलं आहे.

तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी भारतीय वायु दलाचं स्वागत केलं. पण, 200 ते 300 दहशतवादी ठार झाले याचा पुरावा काय असा सवाल केला.

'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?' असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या