PHOTOS : Birthday Special : 'इटली ते नवी दिल्ली', सोनिया गांधींच्या रोमहर्षक प्रवासाची कहाणी

News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2018 01:56 PM IST

PHOTOS : Birthday Special : 'इटली ते नवी दिल्ली', सोनिया गांधींच्या रोमहर्षक प्रवासाची कहाणी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा 09 डिसेंबर हा वाढदिवस. या 72 व्या वाढदिवशी जगभरातल्या नेत्यांनी सोनियांचं अभिष्टचिंतन केलंय. सोनियाजींचा सगळाच प्रवास हा अतिशय चित्तवेधक आहे. या प्रवासात त्यांच्यातल्या खंभीर नेत्याचं, चाणाक्ष राजकारण्याचं त्याचबरोबर एका धोरोदात्त आईचं दर्शनही जगाला झालं.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा 09 डिसेंबर हा वाढदिवस. या 72 व्या वाढदिवशी जगभरातल्या नेत्यांनी सोनियांचं अभिष्टचिंतन केलंय. सोनियाजींचा सगळाच प्रवास हा अतिशय चित्तवेधक आहे. या प्रवासात त्यांच्यातल्या खंबीर नेत्याचं, चाणाक्ष राजकारण्याचं त्याचबरोबर एका धीरोदात्त आईचं दर्शनही जगाला झालं.

इटलितल्या लुसियाना व्हिसेंजा इथं 1946 मध्ये त्यांचा एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झाला. ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची राजीव गांधी या राजबिंड्या तरूणाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा असलेल्या राजीव शी सोनियांनी 1968 मध्ये लग्न केलं आणि त्या गांधी घराण्याच्या सून झाल्या.

इटलीतल्या लुसियाना व्हिसेंजा इथं 1946 मध्ये त्यांचा एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झाला. ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची राजीव गांधी या राजबिंड्या तरूणाशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा असलेल्या राजीवशी सोनियांनी 1968 मध्ये लग्न केलं आणि त्या गांधी घराण्याच्या सून झाल्या.

भारतात सोनियांना सगळच नवीन होतं. इथली भाषा, वातावरण, जेवण, संस्कृती असं सगळच अनोख असल्यामुळे सुरूवातीला सोनियांना या काही दिवस राजीव गांधींचा मित्र असलेल्य अमिताभ बच्चन यांच्या कुटूंबात राहायला गेल्या आणि त्यांनी भारतीय संस्कृती, भाषा, प्रथा परंपरा आत्मसात केली.

भारतात सोनियांना सगळंच नवीन होतं. इथली भाषा, वातावरण, जेवण, संस्कृती असं सगळच अनोख असल्यामुळे सुरूवातीला सोनियांना या काही दिवस राजीव गांधींचा मित्र असलेल्य अमिताभ बच्चन यांच्या कुटूंबात राहायला गेल्या आणि त्यांनी भारतीय संस्कृती, भाषा, प्रथा परंपरा आत्मसात केली.

Loading...

एवढ्या दूर देशातून आल्यानंतर भारतात आल्यावर दडपण होतं. पण इंदिरा गांधींनी पहिल्याच भेटीत त्यांना आपलसं केलं. प्रत्येक गोष्ट आईच्या मायेनी शिकवली त्यामुळं मी लगेच भारतात रमले असं सोनियांनी अनेकदा मुलाखतीत सांगितलं होतं.

इंदिरा गांधींची हत्या हा त्यांना बसलेला मोठा धक्का होता. जेव्हा इंदिराजींवर त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या त्यावेळी सोनिया गांधी या त्याच घरात होत्या. गोळ्यांचा आवाज ऐकून त्या बाहेर आल्या तेव्हा इंदिराजी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. सोनियांनीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र हॉस्पिटलमध्ये जात असतानाच सोनियांच्या मांडीवरच इंदिराजींनी आपले प्राण सोडले.

इंदिरा गांधींची हत्या हा त्यांना बसलेला मोठा धक्का होता. जेव्हा इंदिराजींवर त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्या त्यावेळी सोनिया गांधी या त्याच घरात होत्या. गोळ्यांचा आवाज ऐकून त्या बाहेर आल्या तेव्हा इंदिराजी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. सोनियांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र हॉस्पिटलमध्ये जात असतानाच सोनियांच्या मांडीवरच इंदिराजींनी आपले प्राण सोडले.

इंदिराजींच्या मृत्यूपर्यंत राजीव गांधी हे राजकारणात नव्हते. त्यांना त्यात रूचीही नव्हती. इंदिराजींच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या अभुतपूर्ण परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान होण्यासाठी राजीवजींना गळ घातली आणि अगदी तरूण वयात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.

इंदिराजींच्या मृत्यूपर्यंत राजीव गांधी हे राजकारणात नव्हते. त्यांना त्यात रूचीही नव्हती. इंदिराजींच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान होण्यासाठी राजीवजींना गळ घातली आणि अगदी तरूण वयात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.

राजीवजींनी राजकारणात पडू नये असं सोनियांना वाटत होतं. त्यांनी ठाम नकारही दिला होता. मात्र परिस्थितीच अशी होती की राजीव गांधींना नाही म्हणणं शक्य नव्हतं. सोनियांना खरी काळजी वाटत होती ती राजीव, प्रियाका आणि राहुलच्या सुरक्षेची. पण त्यांना शेवटी राजीव यांचा निर्णय स्वीकारणं भाग पडलं.

राजीवजींनी राजकारणात पडू नये असं सोनियांना वाटत होतं. त्यांनी ठाम नकारही दिला होता. मात्र परिस्थितीच अशी होती की राजीव गांधींना नाही म्हणणं शक्य नव्हतं. सोनियांना खरी काळजी वाटत होती ती राजीव, प्रियांका आणि राहुलच्या सुरक्षेची. पण त्यांना शेवटी राजीव यांचा निर्णय स्वीकारणं भाग पडलं.

21 मे 1991 हा सोनियांच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस. प्रचारसभेत राजीव गांधी यांचा लिट्टे या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने मानवी बॉम्ब ने हत्या केली. सोनिया गांधींवर आभाळ कोसळलं. देशालाही तो मोठा धक्का होता.

21 मे 1991 हा सोनियांच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस. प्रचारसभेत राजीव गांधी यांचा लिट्टे या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने मानवी बॉम्बने हत्या केली. सोनिया गांधींवर आभाळ कोसळलं. देशालाही तो मोठा धक्का होता.

त्या संकटातून बाहेर पडायला त्यांना थोडा वेळ लागला. मात्र त्या त्याही संकटातून बाहेर आल्या. सक्रीय राजकारणातून फार काळ बाहेर राहता येणार नाही हे त्यांना कळून चुकलं. सर्व नेत्यांनी आग्रह केल्यानं काँग्रेस पक्षाच्या पुनरूज्जीनासाठी त्यांनी पक्षाचं सदस्यत्व घेतलं.

त्या संकटातून बाहेर पडायला त्यांना थोडा वेळ लागला. मात्र त्या त्याही संकटातून बाहेर आल्या. सक्रीय राजकारणातून फार काळ बाहेर राहता येणार नाही हे त्यांना कळून चुकलं. सर्व नेत्यांनी आग्रह केल्यानं काँग्रेस पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी त्यांनी पक्षाचं सदस्यत्व घेतलं.

1997 मध्ये त्यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं आणि 1998 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्या राजीव गांधींचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. आणि नंतर विरोधीपक्ष नेत्या बनल्या. नंतर अमेठी हा मतदारसंघ त्यांनी राहुल गांधींना मोकळा करून दिला. त्यानंतर त्या रायबरेली या मतदार संघातून 2004, 2009 आणि 2014 मध्ये सलग विजयी झाल्या.

या राजकीय प्रवासात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टिकेचे प्रहार तर केलेत पण पक्षाचे दिग्गज नेते शरद पवार यांनी त्या मुद्दावरून काँग्रेसपक्ष सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. भारताच्या पंतप्रधान पदावर विदेशी जन्माची व्यक्ती नको अशी त्यांची भूमिका होती.

या राजकीय प्रवासात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेचे प्रहार तर केलेत पण पक्षाचे दिग्गज नेते शरद पवार यांनी त्या मुद्दावरून काँग्रेसपक्ष सोडून नव्या पक्षाची स्थापना केली. भारताच्या पंतप्रधान पदावर विदेशी जन्माची व्यक्ती नको अशी त्यांची भूमिका होती.

सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेसने उभारी घेतली. 2004 ते 2014 या काळात काँग्रेसला सत्ता मिळवून देण्याची किमया करून दाखवली. युपीए-1 च्या वेळी सोनियाच पंतप्रधान होतील असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र निर्णय घेण्याच्या क्षणी अंतरात्म्याचा आवाज ऐकत माघार घेतली आणि मनमोहन सिंग यांचं नाव पुढे केलं.

2017 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली आणि त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. इटली ते नवी दिल्ली हा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र त्या सर्व परिस्थितीवर मात करून त्यांनी आपण 100 टक्के भारतीय संस्कृतीत मिसळल्याचं सिद्ध केलंच त्याच बरोबर काँग्रेसपक्षाला नवी उभारीही दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...