Home /News /news /

मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस, काँग्रेसह इतर पक्षांचे आमदार भाजपने केले 'गायब'?

मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस, काँग्रेसह इतर पक्षांचे आमदार भाजपने केले 'गायब'?

ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय गोंधळ उडाला आणि भोपाळ ते दिल्ली आणि गुडगावपर्यंत गोंधळ उडाला आहे.

    भोपाळ, 04 मार्च : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर मोठं संकट आलं आहे. काँग्रेसचे मोठे नेते आणि आदिवासी आमदार बिसाहुलाल सिंग यांच्यासह सुमारे आठ आमदार भाजपा नेत्यांसमवेत गुरुग्राममधील हॉटेलमध्ये असल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या आमदारांसह बसपाचे आमदार रामबाई हेदेखील हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री उशिरा कमलनाथ सरकारचे (Kamal Nath Government) दोन मंत्री जयवर्धन सिंह (Jayawardhan Singh) आणि जीतू पटवारी (Jeetu Patwari) गुरुग्राम इथं पोहोचले. काँग्रेसच्या आमदारांना केलं बंधक - दिग्विजय सिंह दिग्विजय सिंह हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत, तिथे हॉटेल प्रवेशाबद्दल व्यवस्थापनांशी त्यांचा बराच वाद झाला. यानंतर बसपाचे आमदार रामबाई यांच्यासमवेत मंत्री जयवर्धन सिंह सोबत दिसले. काँग्रेसचा आरोप आहे की, आमदार बिसाहुलाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजप नेत्यांसह ओलीस ठेवले आहेत. तर भाजप आमदारांचा घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपवर सरकार अस्थिर असल्याचा आरोप केला. हरियाणामधील भाजप सरकारमुळे भाजप नेत्यांनी हे हॉटेल निवडलं. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर राजकीय गोंधळ उडाला आणि भोपाळ ते दिल्ली आणि गुडगावपर्यंत गोंधळ उडाला आहे. 'जेव्हा आम्हाला कळलं की जीतू आणि जयवर्धन यांना मानेसरच्या हॉटेलमध्ये पाठवलं' या राजकीय नाटकाच्या प्रकरणात एएनआयने दिग्विजय सिंह यांचा हवाला केला आहे. या ट्विटनुसार, दिग्विजय सिंह म्हणाले की, 'जेव्हा आम्हाला कळलं की जीतू पटवारी आणि जयवर्धन सिंह यांना तिथे (मानेसरचे हॉटेल) पाठविण्यात आलं. ज्या लोकांच्या आम्ही संपर्कात होतो ते आमच्याकडे परत येण्यास तयार होते. बिसाहुलाल आणि रामबाई यांच्याशी आम्ही कायम संपर्कात होतो. भाजपाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हाही रामबाई परत आल्या होत्या. 'आमदारांसोबत गुंडगिरी' दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की, भाजप अहंकारामध्ये बुडाली आहे. भाजपने बसपाच्या आमदार रामबाईंवर गुंडगिरी केली आणि सगळ्यांना ओलिस ठेवलं. दोन दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी भाजपवर आरोप केले होते की भाजप नेते काँग्रेसच्या आमदारांना 25 ते 35 कोटी ऑफर देत आहेत. दिग्विजय सिंह यांनी कॉंग्रेसच्या आमदारांच्या घोडेबाजाराचा भाजपवर आरोप केला. यानंतर काँग्रेसचे आमदार बैजनाथ कुशवाह यांनीही भाजपकडून 25 कोटींची ऑफर असल्याचा आरोप केला. राज्यसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नाटक राज्याच्या कोट्यातून राज्यसभेच्या तीन जागांच्या गदारोळ सुरू आहे. सध्या विधानसभेत 228 सदस्य आहेत. दोन आमदारांच्या निधनानंतर दोन जागा रिक्त आहेत. सध्या काँग्रेसकडे 114, भाजपकडे 107 आमदार आहेत. उर्वरित नऊ जागांपैकी दोन जागा बसपाकडे आहेत तर सपाचे एक आमदार आहेत. त्याचवेळी विधानसभेत चार अपक्ष आमदार असून भाजपचं लक्ष काँग्रेसच्या नाराज आमदारांवर आहे. हेच कारण आहे की, मंत्रीपदाची जागा न मिळाल्याबद्दल रागावलेल्या आदिवासी आमदार बिसाहुलाल यांच्यासह अन्य आमदारांवर भाजपची नजर आहे, परंतु काँग्रेसचे आमदार साथ सोडणार नसल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Kamal Nath, Madhya pradesh, Politics

    पुढील बातम्या