जालना, 28 मे : जालन्यात (Jalna) एका हॉस्पिटलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये (Jalna Police Beaten BJP worker) मोठी कारवाई करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं ( Policemen suspended by Superintendent of Police) आहे. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती.
(वाचा-सरकारचे मौन अधिकच गंभीर! जालन्यातील व्हिडिओबाबत फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
सुमारे दीड महिन्यापूर्वी शिवराज नारीयलवाले यांना पोलिसांनी दीपक हॉस्पिटल याठिकाणी अत्यंत अमानुषपणे मारहाण केली होती. नारीयलवाले यांनी पोलिसांना शिविगाळ करतानाचं मोबाईल रेकॉर्डींग केल्याच्या रागातून त्यांना मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे या घटनेच्या जवळपास दीड महिन्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शिवराज नारीयलवाले वारंवार विनंती करून माफी मागूनही पोलिस त्यांना मारत असल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हारल झाला होता. त्यानंतर सर्वच स्तरांतून या पोलिसांवर कारवाईची मागणी होत होती.
(वाचा-चंद्रकांत पाटलांसह भाजपवाले कोमात! मराठा समाजात गैरसमज पसरवण्याचा डाव-मुश्रिफ)
या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. शिवराज नारीयलवाले यांना हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली म्हणून मारहाण केल्याचं सांगण्यात आलं होतं. पण पोलिस करत असलेल्या शिविगाळीचं मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केलं म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर राग काढल्याचं फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं. तसंच या सर्वांवर कठोर कारवाईची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे फडणवीस यांनी केली होती.
अखेर भाजप नेत्यांसह सर्वांच्या या मागणीला यश आलं. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra police