अमोल गावंडे, प्रतिनिधी
बुलढाणा, 14 जानेवारी : बुलढाण्याहून इंदोरला जाणाऱ्या एका पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. फोर्ड कार आणि झायलो या कारचा भीषण अपघात होऊन ही दुर्देवी घटना घडली आहे.
बुलढण्याहून इंदोरला आरोपींनी घेऊन ही गाडी चालली होती. घटना सोमवारी पहाटे ५.३० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. जखमीमध्ये इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पिएसआयसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही घटना नांदुरा ते मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ घडली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. महामार्गाचे काम थांबलं असल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे अजूनही कायम आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहनं चालवतांना अडचण निर्माण झाली आहे.
सोमवारी पहाटे इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक आणि काही कर्मचारी अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या नातेवाईकांना घेऊन सिंगरोलकडे जात होते.
दरम्यान त्यांची कार नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने ही कार मागून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. अपघातात पोलिसांच्या कारमधील ४ जण ठार झाले असून 4 जखमी झाले आहेत.
कारमध्ये 4 पोलीस आणि आरोपीसह त्याचे 3 नातेवाईक बसले होते. यात आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमींना प्रथम वडनेर इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर मलकापूर इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तर पोलीस आता या अपघाताचा आणखी शोध घेत आहे.
Special Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ?