मुलांनी डोळ्यांदेखल पाहिली आईची आत्महत्या, उपनिरीक्षकाच्या पत्नीने स्वत:वर झाडल्या गोळ्या

मुलांनी डोळ्यांदेखल पाहिली आईची आत्महत्या, उपनिरीक्षकाच्या पत्नीने स्वत:वर झाडल्या गोळ्या

एका पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. पतीच्याच बंदुकीने स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

गडचिरोली, 07 मे : राज्यात सध्या कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. पतीच्याच बंदुकीने स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात येत असताना लोकांना घराच्या बाहेर पडण्याची परवाणगी नाही. त्यात अशा प्रकार आत्महत्येचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

ही घटना गडचिरोलीमधली आहे. मुलचेरा पोलीस ठाण्यात तैनात पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ यांची पत्नी संगीता शिरसाठ यांनी दोन लहान मुलांच्या देखत बंदुकीच्या गोळीने आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक जंगलात अभियान राबवुन घरी परतल्यावर आई-वडिलांना घेऊन कामानिमीत्त गावात गेले होते. त्यानंतर घरी दोन लहान मुलांच्या देखत स्वतःला गोळी मारुन घेतली.

कोरोना संकटात शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा, असाही होतो रोगाचा प्रसार

गोळीचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी आणि पोलिसांनी जखमी अवस्थेत संगीता यांना उपचारासाठी चंद्रपुरला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डोळ्यांदेखत आईने स्वत:ला गोळ्या घातल्याचं पाहिल्यानंतर दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे. पण संगीता यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

लॉकडाऊनमुळे एक पेग दारूसाठी वणवण होत असताना जालन्यात धक्कादायक प्रकार

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संगीता यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस हत्येचं कारण शोधत आहेत.

First published: May 7, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या