Home /News /news /

Prakash Abitkar Shiv sena : बंडखोर आमदार आबिटकरांच्या घरावर चाल करून जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले

Prakash Abitkar Shiv sena : बंडखोर आमदार आबिटकरांच्या घरावर चाल करून जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले

बंडखोर आमदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur shiv sena) आमदार प्रकाश अबीटकर (shiv sena mla prakash abitkar) आणि राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadarvkar) यांचा समावेश आहे.

  कोल्हापूर, 29 जून : शिवसेनेत मोठी फूट पाडत एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केले. शिवसेनेचे 40 आमदार (shiv sena rebel 40 mla) घेऊन जात हीच आमची खरी शिवसेना (shiv sena) असल्याचे ते म्हणाले. दरम्यान याविरोधात काही शिवसैनिक आमदारांच्या घरावर आणि कार्यालयांवर मोर्चे काढताना दिसत आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील 5 आमदारांचा समावेश आहे त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur shiv sena) शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर (shiv sena mla prakash abitkar) आणि राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadarvkar) यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचाही यामध्ये समावेश आहे. 

  दरम्यान आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवसैनिक आणखी संतप्त झाले आहेत. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरातील मुख्य नेते विजय देवणे यांनी बंडखोर आमदार प्रकाश अबीटकर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले कि, बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयार मोर्चा काढण्याचे आम्ही जाहीर केले परंतु पोलिसांनी याला परवानगी नाकारली आहे. पोलिसांना आम्हाला थेट नोटीस देत परवानगी नाकारली असल्याचे त्यांनी सांगितले.

  हे ही वाचा : कोल्हापुरात राडा, शिवसैनिक आणि बंडखोर आमदार यड्रावकर समर्थक भिडले, VIDEO

  शिवसेनेवर ज्या ज्यावेळी अन्याय झाला आहे. किंवा शिवसेनेच्या विरोधात कोणी बंडखोरी केली असेल त्यावेळी शिवसैनिकांनी त्याची तोडफोड करून शिवसेना स्टाईलने उत्तर दिले आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला मोर्चाची परवानगी नाकारली त्या पद्धतीने आम्ही पोलिसांचेकडे तोडून अबिटकरांच्या घरावर आणि कार्यालयावर चाल करू अशा शब्दात विजय देवणे यांनी टीका केली आहे. 

  जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, बंडखोर आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. तुमचा त्रास मी समजू शकतो असेही ते म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटुंबाने देखील आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून सांगितले मग तुम्हाला काय अडचण आहे. कोणाच्या दबावाखाली तुम्ही तिथे राहिला आहात. तुमच्या डोक्यावर कोणी बंदुक लावली आहे का? कोणत्या बॅगा तुम्हाला दिल्या आहेत अशी शंका आम्हाला येत आहे. मला खात्री आहे त्यातील निम्मे आमदार 'फ्लोर टेस्ट' झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत जातील. अन्यथा पुढील निवडणूकीत तुम्ही राजीनामे द्या अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे.

  हे ही वाचा : शिंदे गटाच्या स्वागतासाठी भाजपाची फिल्डिंग, मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन

  बंडखोर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या घरावरही मोर्चा

  शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चाची हाक दिली. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यालयाबाहेर दाखल जमा झाले होते. क्रांती चौकातून शिवसैनिकानी मोर्चाला सुरुवात झाली.  यड्रावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयावर धडक दिली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या