प्रियकरासोबत बनवला पतीला संपवण्याचा प्लान, नवऱ्याचे तुकडे-तुकडे करून 70 किलोमीटवर फेकले

प्रियकरासोबत बनवला पतीला संपवण्याचा प्लान, नवऱ्याचे तुकडे-तुकडे करून 70 किलोमीटवर फेकले

रवीची हत्या पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरू झालं 2010पासून जेव्हा आरोपी कमलचं त्याच्या शेजारी राहणाऱ्या शकुंतलाशी प्रेमसंबंध जुळले.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या एका प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 2011साली अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी तब्बल 9 वर्षांनंतर छडा लावला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 22 वर्षाचा रिक्षाचालक रवी याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आता 9 वर्षानंतर पोलिसांना त्याच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीची हत्या पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरू झालं 2010पासून जेव्हा आरोपी कमलचं त्याच्या शेजारी राहणाऱ्या शकुंतलाशी प्रेमसंबंध जुळले. शकुंतलाचेही कमलवर प्रेम होते. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं पण शकुंतलाच्या कुटुंबीयांकडून नकार देण्यात आला.

प्रेमविवाहास नकार दिल्यानंतर आरोपी शकुंतलाचा विवाह रिक्षाचालक रवीशी लावून देण्यात आला. रिक्षा चालवून रवी घर चालवायचा. लग्नानंतर शकुंतला एकही दिवस सासरी राहिली नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती माहेरी आली आणि तिची गाठ कमलशी झाली. त्यानंतर दोघांनी मिळून त्यांच्या प्रेमाच्या मध्ये असलेला काटा बाजूला करण्याचा प्लान केला.

पतीला मारण्यासाठी शकुंतला सासरी गेली. बाहेर जाऊयात म्हणून तिने रवीला कमलच्या गाडीत बसवलं आणि दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. याबद्दल कोणालाही काही कळू नये यासाठी त्यांनी रवीचा मृतदेह पुरला. पण त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाल्यामुळे कमलने त्याचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्याचे तुकडे करून 70 किलोमीटरवर पुरले.

इतर बातम्या - बेडरुममध्ये प्रियांका-फरहानचा रोमान्स, 'द स्काय इज पिंक'चा UNSEEN VIDEO लीक

या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस रवीचा शोध घेत होती. अखेर 9 वर्षांनंतर पोलिसांना रवीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात यश आलं असून आता पुढील तपास सुरू आहे.

पतीसाठी नराधमांचं ऐकलं, तिघांनी महिलेवर बलात्कार करून शूट केला VIDEO

सरदारशहर पोलिस ठाण्यात 27 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या नवऱ्याला कामावरून काढून टाकेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह बलात्काराची घटना घडवून आणली. या संपूर्ण प्रकारमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी बनवारीलाल यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि शिव भगवान आणि साथीदार मांगीलाल यांनी पीडितेची व्हिडिओ क्लिप बनवली. पीडित महिलेच्या अहवालावरून आरोपी बनवारीलाल, शिव भगवान आणि मांगीलाल यांच्याविरूद्ध सरदारशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर चूरूच्या सरकारी भरतिया रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

इतर बातम्या - Tiktokला टक्कर देण्यासाठी Google आणणार नवीन अ‍ॅप, असे असतील फिचर्स

बस चालक आहे बलात्कार पीडितेचा नवरा

पीडितेच्या नवऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल यांच्या मालकीच्या रोडवेजच्या कंत्राटी बसचा ड्रायव्हर आहे. आरोपीचं त्याच्या घरी येणं-जाणं असतं. 2 सप्टेंबर रोजी शिव भगवान आणि मांगीलाल यांनी नवीन घर दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपीच्या घरी नेलं. बनवारीलाल यांनी नवऱ्याला कामावरून काढून टाकू अशी धमकी देत तिच्या बलात्कार केला.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 8, 2019, 1:27 PM IST
Tags: murder

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading