शिर्डीत चोरांचा माज वाढला, पोलिसांवरच केला गोळीबार

शिर्डीत चोरांचा माज वाढला, पोलिसांवरच केला गोळीबार

काही साखळी चोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. शहरात सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच अशा प्रकारा आरोपींकडून गोळीबार झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 20 नोव्हेंबर : शिर्डी जवळील राहाता शहरामध्ये पोलिसांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही साखळी चोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. शहरात सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच अशा प्रकारा आरोपींकडून गोळीबार झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागिराकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सोनसाखळी चोरांचा पाठलाग करताना आरोपींनी गोळीबार केला. गोळीबारात पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एका आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. श्रीरामपुर येथील सोनसाखळी चोरीच्या टोळीतील सचिन ताठे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस पथक अधिक तपास करत आहे. यामध्ये अजित पठारे यांचीही अधिक माहितीसाठी चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शहरात पोलीस सगळ्यांच्या रक्षणासाठी असतात पण त्यांच्यावर गोळीबार करण्याची चोरट्यांची मजल गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर शिर्डीत पोलिसांचा धडा उरला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 20, 2019, 5:02 PM IST
Tags: Shirdi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading