बोईसरमधून 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

बोईसरमधून 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

बोईसरमध्ये पाचमार्ग, कुडन, पास्थल, गणेशनगर, बोईसर अवधनगर, या भागामध्ये ही लोकं राहत होती.

  • Share this:

पालघर, 16 डिसेंबर : देशभरात नागरिकत्त्व कायद्यावरून वादळ पेटलं असताना मुंबईजवळील वसईतील बाईसर इथं 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एटीएस तसंच अनैतिक मानवी वाहतूक शाखा वसई यांच्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बोईसरमध्ये पाचमार्ग, कुडन, पास्थल, गणेशनगर, बोईसर अवधनगर, या भागामध्ये ही लोकं राहत होती. रोज नाक्यावर कामाकरिता उभे राहून दरररोज वेगवेगळ्या भागामध्ये रोजंदारीवर काम करत होते.

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ही लोकं काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एटीएस आणि  अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या अधिकार्यांनी या परिसरातून आज सकाळी 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

मात्र, त्यामध्ये नागरिकत्व नसल्याचे कागदपत्र नसलेल्या 12  लोकांना ताब्यात घेतलं आहे. या मध्ये 9 महिला आणि 3 पुरुष आहेत. या लोकांकडून 10 मोबाईल जप्त केले आहेत.

त्यामधील  इस्माईल अखिल शेख (35), फिरोज अब्दुला खान (36) इराण रहिम खान (50), राबिया नुर इसलाम काजी (32), राणु मुल्ला तुतामिया शोद्यत (35),  नुर जहा आक्शु शेख (30), माबिया इमरान शिकदार (40), सोनाली इप्तार मुल्ला (24),  शेनाज गाऊज शेख (25),  नजिया टुटूल शेख (34), शुमी रशेल शेख (32) आणि शिरीना ईस्टनफिल शेख (25) अशी त्यांची नावं आहे.

बोईसर परिसरामध्ये आणखी बांगलादेशी राहत असतील या विषयी माहिती घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे अशी माहिती बोईसरचे सहाययक  पोलीस निरीक्षक  प्रदीप पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: police
First Published: Dec 16, 2019 11:58 PM IST

ताज्या बातम्या