• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वर्दीतल्या देवदूताला कडक सॅल्यूट! पूर आणि वादळातही 2 चिमुकलींंना घेऊन 'तो' चालत राहिला...
  • VIDEO: वर्दीतल्या देवदूताला कडक सॅल्यूट! पूर आणि वादळातही 2 चिमुकलींंना घेऊन 'तो' चालत राहिला...

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 08:51 AM IST | Updated On: Aug 11, 2019 08:51 AM IST

    गुजरात, 11 ऑगस्ट : बातमी आहे एका हिरोची...त्याच्या धैर्याची...! गुजरातमधील महापुरात मोरबी पोलीस स्टेशनचे कॉन्स्ट्रेबल पृथ्वीराज जडेजा यांनी पुराच्या पाण्यातून दोन मुलींना वाचवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मोरबा परिसरातील पुराच्या पाण्यात काही कुटुंबं अडकल्याची माहिती मिळाली. त्यात दोन मुली अडकल्या होत्या. चहूबाजूंनी पुराचं पाणी होतं तरीही जीव धोक्यात घालून जडेजा यांनी अडकलेल्या दोन्ही चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेतलं. तशाच अवस्थेत पुरातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं. जडेजा यांच्या धैर्यानं खाकी वर्दीचा सन्मान वाढला आहे. काही तासातच हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहाणारा प्रत्येकजण या हिरोला सॅल्यूट ठोकतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading