S M L

नवी मुंबईतील चार मोठ्या बारवर पोलिसांचा छापा, 36 बारबालांना अटक

नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार हे कामावर रुजू होताच त्यांनी नवी मुंबईतल्या अवैध कामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Updated On: Aug 8, 2018 11:49 AM IST

नवी मुंबईतील चार मोठ्या बारवर पोलिसांचा छापा, 36 बारबालांना अटक

नवी मुंबई, 08 ऑगस्ट : नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार हे कामावर रुजू होताच त्यांनी नवी मुंबईतल्या अवैध कामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या बारवर त्यांनी छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. नेरुळ पोलिसांनी शिरवणे येथील अमृत बारवर सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान अश्लिल चाळे करणाऱ्या 12 महिलांना त्यांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर हे  परवाणगी नसताना असा प्रकार सुरू ठेवल्यामुळे बार मालकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

तर पनवेलमधील दोन बारवर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात तब्बल 24 बालबलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचबरोबर या बार मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या सगळ्या अवैध कामात फारस लक्ष दिलं नाही. त्यामुळे मागील काही वर्षात अवैधरित्या धंदा करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यावर आता नव्याने पोलीस आयुक्तपदी दाखल झालेले संजय कुमार यांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या परिसरातले अनेक डान्स बार उधळून लावले आहेत.

प्रेयसी, मुलगी आणि नातीला जिवंत जाळणार अखेर पोलिसांच्या तावडीत

मागील तीन दिवसात पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी जुगारे आणि गांजा विकणाऱ्या अड्ड्यांवरही कारवाई केली आहे. तर सोमवारी पोलिसांनी अमृत बारवर छापा टाकून कारवाई केली आहे.

या कारवाई दरम्यान, बारमधील महिला वेटर अश्लीव हावभाव करून मनोरंजन करत असल्याचंही दिसलं. त्यामुळे या बारवर कारवाई करत 12 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय कुमार यांच्या या कारवाईमुळे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

Loading...
Loading...

हेही वाचा...

9 ऑगस्टच्या मराठा आंदोलनातून नवी मुंबई बाहेर

VIDEO : मुंबईत चायनीज गाड्यांवर खाताय का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 11:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close