Home /News /news /

नोटांचा पाऊस भासवण्यासाठी पैशाने भरला फ्लॅट, टोळीचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले

नोटांचा पाऊस भासवण्यासाठी पैशाने भरला फ्लॅट, टोळीचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले

पाचशे आणि दोन हजारांच्या कोऱ्या करकरीत नोटांनी एक लहानशी खोली भरुन गेली होती.

    सत्यम सिंग, प्रतिनिधी मुंबई, 01 जानेवारी : जादूटोणा आणि तंत्रमंत्रांतून पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली लोकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. विशेष म्हणजे लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्या टोळीनं एका खोलीत चक्क नोटांची भिंत उभी केली होती. 28 डिसेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही लोक नोटांचा पाऊस पाडण्यासंदर्भात बोलत होते. पोलिसांनी धाड़ टाकून चार लोकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या चौकशीतून निश्वित कुमार शेट्टी याने अनेक लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले असल्याचं उघड झालं. आरोपी निश्वित कुमार शेट्टी हा लोकांना जादू टोण्याच्या मदतीने मृत आत्म्याला बोलावून नोटांच्या पाऊस करणार असं सांगून फसवत होता.  निश्वित कुमार शेट्टीने आपल्या दोन साथिदारांच्या मदतीनं हा उद्योग सुरू केला होता. आघोरी विद्येच्या माध्यमातून नोटांचा पाऊस पाडण्याची बतावणी ते करीत असत. लोकांचा विश्वास बसावा म्हणून निश्वित कुमार शेट्टीनं  मिरारोडमधील एका फ्लॅटमध्ये नोटांची भिंत उभारली होती. पोलीस जेव्हा त्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा पाचशे आणि दोन हजारांच्या कोऱ्या करकरीत नोटांनी एक लहानशी खोली भरुन गेली होती. हा संपूर्ण प्रकार फसवणूक करण्यासाठी रचलेला एक सापळा होता. वेणू गोपाल पिल्लई नावाच्या एका तक्रारदाराने तक्रार केली होती की त्याचे एक कोटी 12 लाख रूपये एकाने घेऊन त्याची फसवणूक केली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा तपास शुरू केला तेव्हा ही मोड्स बघून तेही चक्रावून गेले. खरंतर हे बनावट नोटांचे बंडलं होते. पण लोक या नोटा पाहून आरोपींच्या भूलथापांना बळी पडत असतं. मात्र, जास्तकाळ त्यांचा हा धंदा पोलिसांपासून लपून राहिला नाही. पोलिसांनी आरोपीकडून या बनावट नोटा, बँकेचे बनावट बॉन्ड पेपर , तंत्रमंत्रासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केलं असून आणखी किती जणांना या टोळीनं गंडा घातलाय याचा शोध पोलीस करीत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai crime, Mumbai police

    पुढील बातम्या