मुंबई, 18 जुलै- मुंबई पोलिसांनी काशिमिरा परिसरात राजरोसपणे सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. पोलिसांनी पार्लरवर धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक नगरसेविका अनिता पाटील यांच्या जावई हे पार्लर चालवत होता. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तो फरार झाला आहे. मनीष मकवाना असे त्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिमिरा परिसरातील एका गाळ्यात अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह पार्लरवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या पार्लरचा व्यवस्थापक मजबूर खान, कॅशियर रूद्रेश पवार, वेट इम्रान शेख आणि दोन ग्राहकांचा समावेश आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचा मालक मनीष मकवाना याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष मकवाना सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपी भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांचा जावई असल्याने पोलीस काय कारवाई करतात, याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लगट करण्याचा प्रयत्न
दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांत विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी येथे ही घटना घडली आहे. दादा गोलांडे असे आरोपीचे नाव आहे.
बेलवंडी येथे 15 जुलैला जमिनीच्या वादातून एका दलित महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. एवढेच नाही तर आरोपी दादा गोलांडे याच्यासह त्याच्या साथिदारांनी पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. लज्जा निर्माण होईल, असे वर्तन पीडित महिलेशी करण्यात आले. आरोपी दादा गोलांडे याने पीडितेसह तिच्या कुटूंबीयांनी दमदाटी करून त्यांना जातीवाचक शिविगाळही केली. पीडित महिलेसह तिचे कुटूंब मोलमजुरी व शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. परंतु, ही शेती हडपण्याचा दादा गोलांडे याचा इरादा आहे. 16 जुलैला आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली होती. पतीचे हातपाय बांधून पिकअपमध्ये टाकून मारहान करत बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांसमोरही मारहाण केली. या प्रकरणी आरोपी दादा गोलांडे, गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO