धक्कादायक! स्वत:च्याच रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

धक्कादायक! स्वत:च्याच रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

अनिल परजने हे अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसंच पोलीस ठाण्याचे प्रभारी होते.

  • Share this:

बीड, 15 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

अनिल परजने हे अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तसंच पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. ते 50 वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. परजने जिथे रहात होते, त्या खोलीमध्येच त्यांनी सर्व्हीस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून जीवन संपवलं.

दरम्यान, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. परजने हे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी इथले रहिवाशी होते. त्यांनी त्यांच्या राहत्या खोलीमध्ये स्वत:ला गोळी झाडून घेतली आहे.

त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या अशा जाण्यावर परिसरातून शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनिल यांनी वापरलेली रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आहे.

तर त्यांनी पोलिसांचा अनिल यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.

VIDEO : नितीन राठोड यांच्या जाण्यानं 'हे' गाव बुडालं शोकसागरात; नाही पेटली चूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading