मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जैसी करणी...! पोलिसांनी मास्क देऊनही परिधान केला नाही, ठोठावला 10 हजारांचा दंड

जैसी करणी...! पोलिसांनी मास्क देऊनही परिधान केला नाही, ठोठावला 10 हजारांचा दंड

पहिल्यांदा 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यातून त्यानं काहीही धडा घेतला नाही. दोन दिवसांनंतर पुन्हा पोलिसांना तो विनामास्क फिरताना आढळला तर पोलिसांनी त्याला 10 हजारांचा दंड ठोठावला.

  • Published by:  News18 Desk

देवरिया, 19 एप्रिल : कोरोनाच्या संकटातून सुटका होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी खबरदारी आणि कोरोनाच्या नियमांचं पालन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आता पोलिस आणि प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये पोलिसांनी मास्क परिधान न करणाऱ्या एकाला 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. सलग दुसऱ्यांदा पोलिसांच्या तपासणीत तो विनामास्क सापडला, त्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

(वाचा-Corona vaccine update: 55 लाख रुपये खर्च करून दुबईत जाऊन घेतली जातेय लस)

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी पोलिसांतर्फे तपासणी केली जात आहे. तसंच कोरोनाच्या मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्येही पोलिसांनी अशीच कारवाई सुरू केली आहे. याठिकाणी पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीला मास्क परिधान केलं नाही म्हणून चक्क 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. आता दहा हजारांचा दंड का ठोठावला यामागंही एक कारण आहे. सलग दुसऱ्यांदा पोलिसांच्या तपासणीत हा व्यक्ती विनामास्क फिरताना आढळला होता.

(वाचा-मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय? शहरातील दिलासादायक आकडेवारी समोर)

दोनच दिवसांपूर्वी केली होती कारवाई

देवरियाचे पोलिस अधीक्षक श्रीपती मित्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हाच व्यक्ती पोलिसांच्या तपासणीमध्ये मास्क परिधान न करता फिरताना आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली. त्याला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पण त्यातून त्यानं काहीही धडा घेतला नाही. दोन दिवसांनंतर पुन्हा पोलिसांना तो विनामास्क फिरताना आढळला तर पोलिसांनी त्याला 10 हजारांचा दंड ठोठावला.

विशेष म्हणजे पहिल्यांदा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी या व्यक्तीला पोलिसांनी स्वतः मास्क दिला होता. पण तरीही परिस्थितीचं गांभीर्य न बाळगता हा व्यक्ती विनामास्क फिरत होता. त्यामुळं पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली. प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही जबाबदारी ओळखून या संकटात नियमांचं पालन केल्यास यावर मात करणं सोपं जाईल, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

First published: