खाकीला काळीमा! कॉन्स्टेबलनेच महिलांचे कपडे बदलताना बाथरूममध्ये केला VIDEO शूट

खाकीला काळीमा! कॉन्स्टेबलनेच महिलांचे कपडे बदलताना बाथरूममध्ये केला VIDEO शूट

बँकेच्या बाथरूममध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल महिलांचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ शूट करत होता.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : आपण सगळ्यात जास्त विश्वास ज्यांच्यावर ठेवतो अशा पालिसांनीच जर गुन्हा केला तर आपली सुरक्षा धोक्यात आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणारं एक प्रकरण मुंबईत समोर आलं आहे. बँकेच्या बाथरूममध्ये महिलांचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असाच धक्कादायक प्रकार केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बँकेच्या बाथरूममध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल महिलांचे कपडे बदलण्याचा व्हिडिओ शूट करत होता. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कॉन्टेबलला ताब्यात घेतलं. अनिकेत परब असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. या सगळ्या प्रकरामुळे कर्मचारी महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वांद्रे पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असल्याची माहिती वांद्रे पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर वर्दीला काळीमा फासवणार हा प्रकार केल्यामुळे अनिकेत परबला पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, महिलांच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शौचालया किंवा चेंजिंग रुम वापरताना काळजी घ्या अशा अनेकवेळी सुचना देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या - शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

सावधान! मॉलच्या लेडिज चेंजिंग रूममध्ये सापडलं 'हे'; ट्रायल रूम वापरण्याआधी हे वाचा

नागपूरमध्ये एका मॉलमधल्या महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल फोन आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणींचे अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं. आता प्रत्येक मोठ्या मॉल्समध्ये चेंजिंग रूम्स असणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. कपडे विकत घेतल्यानंतर ते ट्राय करून पाहण्यासाठी या रूम्स वापरल्या जातात. मात्र, नागपुरातल्या एका मॉलमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून अश्लिल व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. सीताबर्डीतील फ्रेण्डस् या कपड्याच्या दुकानातील महिलांच्या चेंजिंग रूममध्ये हा विकृत प्रकार उघडकीस आला होता.

इतर बातम्या - VIDEO: रस्त्यावर गाणं गात स्टार झालेल्या रानू यांच्या जादुई आवाजाचा दुसरा धमाका

रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविणाऱ्या युवतीचा अश्लील व्हिडीओ बनविला गेल्याचे त्यातून उघडकीस आलं. सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन दुकानमालक किसन इंदरचंद अग्रवाल तसेच निखील ऊर्फ पिंटू दीपक चौथमल या दोघांना अटक करण्यात आली होती. या आधीही असे गैर प्रकार उघडकीस आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्रिपदाबद्दल आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य, पाहा हा VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2019, 5:16 PM IST
Tags: cctv

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading