मास्क का घातला नाही? असं विचारताच तरुणांचा पोलिसांवर सशस्त्र हल्ला, 3 जवान जखमी

मास्क का घातला नाही? असं विचारताच तरुणांचा पोलिसांवर सशस्त्र हल्ला, 3 जवान जखमी

पोलिसांनी त्या तरुणांना त्यांनी मास्क का नाही लावला याबद्दल विचारले असता या तरुणांमध्ये व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन 15 ते 17 जणांच्या टोळक्याने पोलीस अधिकाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

  • Share this:

 मुंबई 16 मे:  मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील गरीब नवाज नगर येथे पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे.  14 मे रोजी संध्याकाळच्या वेळेस स्थानिक पोलिस  व एसआरपीएफ चे काही पोलिस कर्मचारी गरीब नवाज नगर परिसरामध्ये गस्त घालत असताना काही तरुण  मास्क ना लावता टोळक्याने परिसरात फिरत असल्याचे समोर आले.यावेळी पोलिसांनी त्या तरुणांना त्यांनी मास्क का नाही लावला याबद्दल विचारले असता या तरुणांमध्ये व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन 15 ते 17 जणांच्या टोळक्याने पोलीस अधिकाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या घटनेमध्ये अँटॉप हिलं पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व एसआरपीएफ चे 2 जवान असे 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या संदर्भात पोलिसांनी कलम 307 , 353 , 144,188 , नुसार गुन्हा नोंदविला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

अन्य एका घटनेत ठाण्यातल्या मुंब्रा इथंही पोलिसांनवर हल्ला करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळातही मुंब्र्यात तुफान हाणामारी झाली. धक्कादायक म्हणजे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक केली. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे.

कोरोनाविरोधी युद्धाची तयारी पाहण्यासाठी 80 व्या वर्षीही शरद पवार उतरले मैदानात

  मांजराचा त्रास होत असल्याने एकमेकांशी भिडलेल्या शेजाऱ्यांची हाणामारी सोडविण्यासाठी पोलीस गेले आणि पोलिसांवरच जमावाने दगडफेक करुन ह्ल्ला केला. हल्यात काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पोहोचला कोरोना, 24 तासातले COVID19चे अपडेट

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फेमस काँलनी भागातील साईकिरण सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर नासीर पटेल कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या पटेल कुटुंबाच्या घरी असलेल्या मांजरीचा त्रास होतो. मांजरीला घरात ठेवा अशी तक्रार सोसायटीमध्ये रहात असलेल्या यास्मिन खानच्या भावाने पटेल कुटुंबाकडे केली होती. त्यावरून उदभवलेल्या वादावादीत नासीर पटेल तसेच, त्यांची मुले फहाद, फरहान, परेश, फराज व जरीना आणि आरीफ पतंगवाला यांनी लोखंडी राँड, लाकडी बांबू आणि सळीने मारहाण करण्यास सुरवात केली.

First published: May 16, 2020, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading