S M L

एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन मारहाण प्रकरणी आता भाजपच्या नगरसेवकांची धरपकड सुरू झाली आहे.

Updated On: Aug 20, 2018 04:49 PM IST

एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपचे नेते पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद, 20 ऑगस्ट : औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन मारहाण प्रकरणी आता भाजपच्या नगरसेवकांची धरपकड सुरू झाली आहे. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर राज वानखेडे आणि प्रमोद राठोड यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 17 ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएमच्या सय्यद मतीनने विरोध केला होता. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मतीनला चपलेनं चांगलाच चोप दिला होता.

या प्रकरणात धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगा भडकवण्याच्या आरोपाखाली सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, राज वानखेडे यांच्याविरोधातही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी 17 ऑगस्टला सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला.



वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक

यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरश: खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी तर मतीन यांना चपलेने मारले.

दरम्यान, या प्रकरणावरून औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे नेते जमले होते. अखेर पोलिसांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

Loading...
Loading...

 

VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 04:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close