साक्षी तन्वरच्या वडिलांना लावला ९ लाखांचा गंडा, चार आरोपी ताब्यात

साक्षी तन्वरच्या वडिलांना लावला ९ लाखांचा गंडा, चार आरोपी ताब्यात

काही दिवसांपूर्वी राजेंद्र तन्वर यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने स्वतःची माहिती देताना तो एका विमा कंपनीचा एजंट असल्याचं म्हटलं.

  • Share this:

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वरला नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी विमा योजनेच्या नावाखाली साक्षीच्या वडिलांना राजेंद्र तन्वर यांना जवळपास नऊ लाख रुपयांना लुटले. याप्रकरणी साक्षीने गेल्या महिन्यात १८ जानेवारीला साक्षीने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.

एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी राजेंद्र तन्वर यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने स्वतःची माहिती देताना तो एका विमा कंपनीचा एजंट असल्याचं म्हटलं. त्याने साक्षीचं नाव घेत तिच्या बाबांना म्हटलं की कंपनी प्रीमियममध्ये अभिनेत्रीच्या नावावर कंपनी तिला १ लाख रुपयांची सुट देईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विम्याचा हफ्ता भरण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी होता. मात्र एजंट होऊन बोलणाऱ्या त्या आरोपीने राजेंद्र यांना सांगितलं की, त्याच्याकडे खास स्किम आहे, ज्यामुळे विमाधारकाला १ लाख रुपयांची सूट मिळू शकते. मात्र प्रीमियमची रक्कम १ ते २ दिवसांमध्ये करण्याची अट त्याने घातली. यानंतर १० लाखांऐवजी फक्त ९ लाख रक्कम भरावी लागणार असल्याचं तो आरोपी म्हणाला.

फोन करून आरोपीने राजेंद्र तन्वर यांना आपला बँक अकाऊंट नंबरही दिला आणि ९ लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. साक्षीने याबद्दल पोलिसांत तक्रार केली असता त्यांना पैसे भरल्याची कोणतीही पावती मिळाली नसल्याचं ती म्हणाली. यानंतर त्यांनी विमा कंपनीला फोन केला. तेव्हा कंपनीकडून अशा कोणत्याही प्रकारची स्कीम सुरू नसल्याची माहिती मिळाली.

तक्रारीनंतर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा सिंगापूरमधली ती बँक असल्याचं समोर आलं. यानंतर अधिक चौकशीनंतर दिल्ली- एनसीआरने चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव अजीत सिंग (२८), कृष्णा कुमार (३०), पवन कुमार (२९) आणि अब्दुल हुसैन (२३) असं आहे.

SPECIAL REPORT : 'शरण या, अन्यथा मरणाला तयार राहा'

First published: February 20, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading