मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बिअर बारला उत, तब्बल 26 जणांवर धडक कारवाई

यामध्ये बिअर आणि विदेशी दारूसह रुपये 11405 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 11:59 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बिअर बारला उत, तब्बल 26 जणांवर धडक कारवाई

नागपूर, 13 ऑक्टोबर : मुख्यमंत्र्याच्या नागपुरात सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू व्यवसाय देणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या 26 जणांवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागानी संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन सावजी भोजनालय  जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील सिंध मराठा सावजी, पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील काश्मीरी रेस्टॉरंट आणि पिंटू ढाबा इत्यादींचा समावेश आहे.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अशा दारू व्यवसायामुळे परिसरात भीतीचं वातावरण असतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू व्यवसाय सुरू आहे. मद्यपी मद्यधुंद असल्याची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत बार आणि ढाब्यांवर कारवाई केली. यामध्ये तब्बल 26 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये बिअर आणि विदेशी दारूसह रुपये 11405 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हॉटेल मालक विनय नित्यानंद जयस्वाल, संतोष भारत हरियानी, हरजींदर सिंग हर्वणसिंग परमार यास अटक करण्यात आली आहे. तसेच हॉटेल काश्मिरचा मालक फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मद्यपान करणाऱ्यांना ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949मधील कलम 68 व 84नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शहरांत आणखी कुठे अवैध व्यवसाय सुरू आहे का याचीही माहिती काढण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. एकीकडे तरुणाई अशा प्रकारे दारूच्या विळख्यात अडकत असताना येवल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मोर्शी तालुक्यातील येवला येथील यूवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेचं वार आहे. प्रत्येक पक्षाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आश्वासन दिली जात असताना खरं पाहिला गेलं तर शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागत नसल्याचं या घटनेमुळे समोर आलं आहे. तरुण शेतकऱ्याच्या अशा आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

इतर बातम्या - PMC नंतर आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत!

संतोष हरोडे असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्याकडे 4 एकर शेती आहे. शेतीसाठी हरोडे यांनी आतापर्यंत साडे तीन लाख रुपये कर्ज काढलं. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नापिकी ओढवली. या सगळ्यावर हरोडे त्रस्त झाले होते. कर्ज कसं फेडावं आणि मुलांचं पालनपोषण कसं करावं याचा सतत विचार करत होते. याच नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - दिवसा कडक ऊन सायंकाळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, असं आहे आज राज्यातलं हवामान!

अखेर येवला जवळच्या अमरावती नरखेड रेल्वे मार्गावर संतोष यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरातील कपड्यामध्ये चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठीमध्ये त्यांनी कुटुंबाची माफी सुध्दा मागितली होती. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण हरोडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ज्याच्या जीवावर घरात चूल पेटत होती तोच आता या जगात नसल्यामुळे लहान लेकरांनी कोणाकडे बघायचं असा मोठा प्रश्न हरोडे कुटुंबासमोर आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्र जिंकण्यासाठी आज मोदी, अमित शहा मैदानात; सत्ताधारी, विरोधकांमध्ये टशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagpur
First Published: Oct 13, 2019 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...