VIDEO थंडीचा कहर : केस सुकवण्यासाठी घराबाहेर गेली अन् केसच गोठले

VIDEO थंडीचा कहर : केस सुकवण्यासाठी घराबाहेर गेली अन् केसच गोठले

अमेरिकेत थंडीचा कडाका इतका आहे की गरम पाणी फेकताच त्याचाही बर्फ होत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 2 फेब्रुवारी : अमेरिकेत थंडीने कहर केला आहे. आर्किटीक कोल्ड (थंड हवा) वादळाचा तडाखा बसल्याने सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर बर्फ साचला असून मध्यपश्चिम भागातील अनेक शहरांमधील नद्या आणि तलाव गोठले आहेत.

कमी तापमानामुळे गोठलेल्या अमेरिकेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून तिथल्या थंडीची कल्पना करू शकतो. तिने केस धुतल्यानंतर ते कोरडे करण्यासाठी घराबाहेर गेली. त्यानंतर तिचे केस काही क्षणातच गोठले. त्यानंतर तिने फक्त 13 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2.7 मिलियन वेळा पाहिला गेला आहे.

रेल्वे सेवा सुरु ठेवण्यासाठी चाकांना गरम ठेवण्यासाठी आग पेटवावी लागत आहे. शिकागोमध्ये तर अंटार्क्टिका पेक्षा अधिक थंडी आहे. तापमानात कमालीची घट झाली असून ते उणे 30 अंश डिग्रीच्या खाली गेले आहे. गरम पाणीही हवेत फेकताच गोठून जातं.

First published: February 2, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading