सूडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

सूडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

सूड घेण्याचा उद्देशाने संपूर्ण कुटुंबाला संपविण्यासाठी एका माथेफिरुने विहिरीच्या पाण्यात विष टाकल्याची धक्कादायक घटना नांदगावच्या साकोरा येथे घडली.ही बाब विहिर मालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे सुदैवाने सगळ्यांचे प्राण थोडक्यात बचावले.

  • Share this:

बब्बू शेख (प्रतिनिधी)

मनमाड, 18 मे- सूड घेण्याचा उद्देशाने संपूर्ण कुटुंबाला संपविण्यासाठी एका माथेफिरुने विहिरीच्या पाण्यात विष टाकल्याची धक्कादायक घटना नांदगावच्या साकोरा येथे घडली.ही बाब विहिर मालकाच्या वेळीच लक्षात आल्यामुळे सुदैवाने सगळ्यांचे प्राण थोडक्यात बचावले.

मिळालेली माहिती अशी की, सूडाने पेटलेल्या एका माथेफिरूने संपूर्ण कुटुंबीयाला संपविण्यासाठी चक्क विहिरीतील पाण्यात विष टाकले. सुदैवाने वेळीच हा प्रकार विहिर मालकाच्या निदर्शनास आल्यामुळे कुटुंबासोबत त्याच्याकडे असलेली जनावरांचाही जीव थोडक्यात बचावला. शांताराम बोरसे हा शेतकरी आपल्या कुटुंबीयांसोबत साकोरा गावात राहतो. त्याच्याकडे गायी व बैल देखील आहेत. त्याच्या शेतात असलेल्या विहिरीला चांगले पाणी असून त्याचा वापर ते पिण्यासाठीही करतात. जनावरांना पाजण्यासाठी ते विहिरीवरून आणण्यासाठी गेले होते. पाण्यात त्यांना फेस आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला. वेळीच हा प्रकार बोरसे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांची जनावरांचाही जीव वाचला. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मनमाड परिसरात तर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. केवळ सूड घेण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष टाकण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. ग्रामीण भागात तर विहिरींना तळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी महिला आणि अबालवृद्धांना पायपीट करावी लागत आहे.

गावाली पाणी पुरवठा करणारी टाकी कोसळली..

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नुकतीच टाकी बांधण्यात आली होती. ती टाकी शुक्रवारी (ता.17) सायंकाळी कोसळली. गावात आधीच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना गावाची तहान भागविण्याची जबाबदारी ज्या टाकीवर होती. तीच पत्त्याच्या बंगल्याच्या सारखी कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात, याची प्रचिती डांगसौंदाणे गावातील ग्रामस्थांना आली आहे. आता पाण्याचे पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.

SPECIAL REPORT: दुष्काळ, चिंता, हृदयविकाराचा झटका आणि...मृत्यू

First published: May 18, 2019, 4:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading