भुजबळांच्या जामिनावर 'पीएमएलए' कोर्ट पुढच्या सुनावणीत निर्णय घेणार

पीएमएलए कायद्यातलं 45 वं कलम सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवताच भुजबळांचे वकील शलभ सक्सेना यांनी त्याच दिवशी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. त्यावर आज सुनावणी झाली. पण ईडीचे वकील गैरहजर राहिल्याने कोर्टाने भुजबळांच्या जामीन अर्जावरची सुनावणी एक आठवडा तहकूब केली आहे

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2017 07:15 PM IST

भुजबळांच्या जामिनावर 'पीएमएलए' कोर्ट पुढच्या सुनावणीत निर्णय घेणार

24 नोव्हेंबर, मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आर्थर रोड जेलमधे असलेले छगन भुजबळांना आता दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत. 'पीएमएलए' अर्थात 'मनी लॉन्ड्रिंग'विरोधी कायद्यातलं कलम 45 रद्द झाल्यानं त्याचा फायदा भुजबळांना मिळू शकतो. भुजबळांनाही याच कलम 45 गेल्या दीड वर्षांपासून जामीन मिळू शकलेला नाही. या कलमाखाली सरकारला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात एखाद्या आरोपीला गुन्हा सिद्ध होण्याआधी अमर्याद काळ तुरूंगात ठेवणे, त्याला जामीन नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता. त्यामुळे आरोपीला जामीन मिळणं कठीण असतं, मात्र सुप्रीम कोर्टानं एका खटल्यावरील सुनावणीदरम्यान 'मनी लॉन्ड्रींगविरोधी कायद्यातलं हे कलम 45 घटनाबाह्य ठरवलंय. त्यामुळे भुजबळांचा जामिनाचा मार्ग सोपा झालाय.

पीएमएलए कायद्यातलं 45 वं कलम सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवताच भुजबळांचे वकील शलभ सक्सेना यांनी त्याच दिवशी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. त्यावर आज सुनावणी झाली. पण ईडीचे वकील गैरहजर राहिल्याने कोर्टाने भुजबळांच्या जामीन अर्जावरची सुनावणी एक आठवडा तहकूब केली आहे. याप्रकरणी कोर्टानं आज दोन्ही पक्षांना आपसात ठरवून पुढील सुनावणीची तारीख कळवण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे पुढच्या तारखेला कदाचित भुजबळांना जामीन मिळू शकतो. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने छगन भुजबळांवर गुन्हा दाखल केल्यापासून ते तुरूंगातच आहेत.

कलम 45 मध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

कलम 45 नुसार न्यायाधीश आरोपीला तेव्हाच जामीन देऊ शकतात. जेव्हा त्यांना पूर्णपणे खात्री असेल की आरोपीनं कोणाताही गुन्हा केलेला नाही. तसेच न्यायाधीशांना याचीही खात्री असायला हवी की, जामीन मिळाल्यावर तो पुन्हा कोणताही गुन्हा करणार नाही. अशा किचकट अटी या कलमामध्ये घालण्यात आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...