S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • PM Narendra Modi Trailer- सिनेमातून दिसणार विवेक ओबेरॉयचा 'मोदी अवतार'
  • PM Narendra Modi Trailer- सिनेमातून दिसणार विवेक ओबेरॉयचा 'मोदी अवतार'

    Published On: Mar 20, 2019 05:52 PM IST | Updated On: Mar 20, 2019 05:52 PM IST

    मुंबई, २० मार्च- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या सिनेमाचा दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं. सिनेमात मोदी यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली. आधी हा सिनेमा १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा एक आठवडा आधी अर्थात ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे निर्माते संदीप एस सिंग म्हणाले की, ‘आम्ही चाहत्यांच्या मागणीवर हा सिनेमा एक आठवडा आधी प्रदर्शित करत आहोत. या सिनेमासाठी लोकांमध्ये फार प्रेम आणि अपेक्षा आहेत. त्यामुळेच आम्ही लोकांना फार वाट पाहायला नाही लावणार. ही १.३ अब्ज लोकांची गोष्ट आहे आणि त्यांना त्यांची गोष्ट दाखवण्यासाठी मी फार थांबू शकत नाही.’ अगदी थोड्या वेळात या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close