22 मार्चला जनता कर्फ्यू : रविवारी नेमकं काय होणार? वाचा मोदींच्या भाषणातले 17 महत्त्वाचे मुद्दे

22 मार्चला जनता कर्फ्यू : रविवारी नेमकं काय होणार? वाचा मोदींच्या भाषणातले 17 महत्त्वाचे मुद्दे

रविवारी 22 मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका संचारबंदी लागू करण्यात येणार असून सगळ्यांनी त्यांचं पालन करावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : संपूर्ण जगावर खूप मोठं संकट आलं असून यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून दिल्या आहेत. रविवारी 22 मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका संचारबंदी लागू करण्यात येणार असून सगळ्यांनी त्यांचं पालन करावं असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे. पण या सगळ्यात कुठेही अन्यधान्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी ग्वाहीदेखील मोदींकडून देण्यात आली आहे.

दरम्यान , कोरोनासारख्या महामारीला जनतेनंच हरवायचं आहे यासाठी घराबाहेर न पडता काळजी घ्या आणि सतर्क रहा असं मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कोरोनासारख्या आजारावर दोन हात करण्यासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली तर कोरोना भारतातून कसा हद्दपार करायचा याच्या सुचना जनतेला दिल्या आहेत.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- आपण निरोगी राहिलो तर जग निरोगी राहिल

- कोरोनाचा सामना करण्यासाठी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे

- गर्दीपासून साावध रहा, घराच्या बाहेर निघू नका

- जितकं शक्य आहे तितकं घरी राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढी कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा

- सरकारी कर्मचारी, रुग्णालयं आणि पत्रकारांना काम करणं महत्त्वाचं आहे. पण इतरांनी स्वत:ला आयसोलेटेड करणं महत्त्वाचं आहे

- वयोवृद्धांनी पुढचे काही दिवस घराच्या बाहेर पाऊल टाकू नका

- 22 मार्चला संचारबंदी लागू करण्यात येईल, त्याचं सगळेजण पालन करूया

- जनतेनं जनतेसाठी संचारबंदी करा

- सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका

- जनता कर्फ्यूचा संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा

- ही कसोटी कोरोनाविरुद्ध चाचणी आहे

- रविवारी आपण आपल्या दरवाजासमोर उभं राहून संध्याकाळी 5 वाजता अशा लोकांचे आभार व्यक्त करा ज्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.

- 22 मार्चला सगळ्यांचे कृतज्ञतेने आभार माना

- रुटीन चेकअपसाठीसुद्धा घराच्या बाहेर पडू नका. शक्य असेल तर डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घ्या

- या महामारीमुळे देशातील सर्वसामान्यांवर आर्थिक अडचण आहे.

- मोठ्या वर्गातील लोकांना निवदेन आहे की तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करा.

- जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा पडणार नाही. अन्यधान्य कमी पडणार नाही

First published: March 19, 2020, 8:49 PM IST

ताज्या बातम्या