राम मंदिराच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, केला हा आरोप

राम मंदिराच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, केला हा आरोप

पंतप्रधान बोलत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. त्यावर पंतप्रधानांनी राहुल गांधींना टोला लगावला. ते म्हणाले, मी गेल्या 45-45 मिनिटांपासून बोलत आहे. मात्र करंट आता लागलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 6 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिलं. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका, CAA आणि NRC विरुद्धचं आंदोलन यामुळे पंतप्रधान काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर राम मंदिर आणि 370 सारखा प्रश्न हा सुटलाच नसता. ज्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी असे विषय दशकांपासून तसेच ठेवले होते. तीन तलाकचा मुद्दाही त्यांनी असाच प्रलंबित ठेवला होता. पंतप्रधानांच्या या टीकेवरून काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी पंतप्रधानांना गांधीजींवर भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका केली. त्यावर पंतप्रधान म्हणाले, गांधी हा विषय तुमच्यासाठी ट्रेलर असेल माझ्यासाठी तो जीवनाचा विषय आहे.

कवि  सर्वेश्वर दयाल सक्सेना यांच्या कवितेचा उल्लेख केला.

लीक पर वे चलें जिनके

चरण दुर्बल और हारे हैं,

हमें तो जो हमारी यात्रा से बने

ऐसे अनिर्मित पन्थ प्यारे हैं.'

आणखी काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान बोलत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला. त्यावर पंतप्रधानांनी राहुल गांधींना टोला लगावला. ते म्हणाले, मी गेल्या 45-45 मिनिटांपासून बोलत आहे. मात्र करंट आता लागलाय.

जुन्या मार्गानं गेलो असतो तर परिवर्तन झालं नसतं. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आम्ही निर्णयांची घाई का करतोय अशी विरोधकांना चिंता आहे. याचवेळी विरोधकांनी भाषणादरम्यान गोंधळ घातला. गांधीजी आमच्यासाठी जीवन पण तुमच्यासाठी ट्रेलर. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात नवभारतासाठीचा मार्ग दाखवला. कॉंग्रेसच्या मार्गानं गेलो असतो तर कलम 370 रद्द करु शकलो नसतो

तुमच्या सारखं काम मला करायचं नाही.

भारत - बांग्लादेश वाद कधी संपलाच नसता. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाला नसता, आम्ही वेगाने 37 कोटी बँक अकाऊंट उघडले नसते, 13 कोटी गॅस मिळाले नसते. 2 कोटी नवे घरं झालीच नसती. दिल्लीत 1700 पेक्षा जास्त अवैध कॉलनी अधिकृत झाल्या नसल्या. 11 कोटी लोकांच्या घरात टॉयलेट बांधली नसती. ईशान्यकडची राज्य आमची वोट बँक नाही

दिल्ली आता ईशान्यच्या दरवाजात पोहोचली आहे.

First published: February 6, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या