केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं,मोदींनी घेतलं पहिलं दर्शन

केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं,मोदींनी घेतलं पहिलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय

 • Share this:

03 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर असून महाप्रलयानंतर आज पहिल्यांदाच केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं दर्शन घेतलं आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दर्शन घेतलं होतं. 2013च्या महाप्रलयानंतर आज पहिल्यांदाच केदारनाथाचे द्वार उघडलं गेलं आहे. त्यामुळे भावकांना 3 वर्षांनंतर पुन्हा केदारनाथाचे दर्शन घेण्यात येणार आहे.

अक्षय्य तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या काळात हे मंदिर बंद असतं. आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यांतून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतील.

शिव शंकराचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या केदारनाथाचं हे शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वांत उंचीवरचं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. जून 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये या मंदिराच्या भिंती वाहून गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या मंदिराची पुन्हा उभारणी करण्यात आली.

केदारनाथ मंदिर महात्म्य  : आज दरवाजे उघडले

 • उत्तराखंडच्या महापुरातही टिकून राहिलं मंदीर
 • 1000 वर्षापूर्वी झाली होती मंदिराची बांधणी
 • 400 वर्षे मंदिर गाडलं गेलं असल्याचाही संशोधकांचा दावा
 • केदारनाथच्या निर्मितीविषयी अनेक दंतकथा
 • माळव्याच्या राजा भोजनं 1076 साली मंदिर बांधल्याचा दावा
 • 8व्या शतकात आदी शंकराचार्यांनी मंदीर बांधल्याची दुसरी थिअरी
 • केदारनाथ मंदिराची उंची- 85 फूट
 • केदारनाथ मंदिराची लांबी- 187 फूट
 • केदारनाथ मंदिराच्या भिंतीची जाडी- 12 फूट
 • केदारनाथ मंदिराचं क्षेत्रफळ - 80 चौरस फूट
 • केदारनाथ परिसरात मंदाकिनी, मधुगंगा, छिरगंगा, सरस्वती आणि स्वरांद्री या पाच नद्या उगम पावतात

First published: May 3, 2017, 11:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading