Home /News /news /

PM मोदींनी कोरोनासंबंधीत मंत्री आणि अधिकाऱ्यांशी केली चर्चा, 5 राज्यांची चिंता वाढली

PM मोदींनी कोरोनासंबंधीत मंत्री आणि अधिकाऱ्यांशी केली चर्चा, 5 राज्यांची चिंता वाढली

    नवी दिल्ली, 13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिड-19 साथीच्या विरोधात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची महत्त्लाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या स्थितीचा आणि वाढत्या आकड्यांचा आढावा घेण्यात आला. याणध्ये दिल्लीसह विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, महासंचालक आयसीएमआर आणि सशक्त गटांचे अन्य संबंधित गट उपस्थित होते. विनोद पॉल यांनी सादर केलं प्रेझेंटेशन एनआयटीआय आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी सद्यस्थिती आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीची माहिती सगळ्यांना दिली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दोन तृतीयांश प्रकरणं पाच राज्यात असून मोठ्या शहरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं सांगण्यात आलं. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कोरोना चाचण्या, बेड आणि आरोग्य सुविधांची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. पंतप्रधानांनी दिला हा सल्ला या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी रुग्णालयातील बेड, क्वारंटाईन सेंटर यावर चर्चा केली. आवश्यकतेनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या अधिका्यांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याची सुरूवात लक्षात घेता योग्य ती तयारी करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी मंत्रालयाला दिला. मुंबईत कोरोनाचा उद्रेक थांबेना, आजही सर्वात जास्त 69 मृत्यू आणि नवे रुग्ण सापडले; वाचा अपडेट आजही राज्यात 3427 नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 568वर गेली आहे. तर गेल्या दिवसभरात 113 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या मृतांची संख्या 3830 वर गेली आहे. आजही मुंबईत सर्वाधिक 69 मृत्यू मुंबईत झालेत तर पुण्यात 10 मृत्यू झाले. सर्वात जास्त रुग्णही मुंबईतच सापडले असून त्यांची संख्या दीड हजारांच्या वर आहे. आज 1550लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत 49 हजार 346 जणांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या