गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का? - मोदींचा हल्लाबोल

गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का? - मोदींचा हल्लाबोल

'फक्त पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तिला अध्यक्ष करावं तरच पंडित नहरूंनी लोकशाही खरी तत्व रूजवली असं मी मान्य करतो'

  • Share this:

रायपूर, ता.16 नोव्हेंबर : छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अंबिकापूर इथल्या जाहीर सभेत काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या काँग्रेसने फक्त पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तिला अध्यक्ष करावं तरच पंडित नहरूंनी लोकशाही खरी तत्व रूजवली असं मी मान्य करतो असंही ते म्हणाले.

या प्रचारसभेत पंतप्रधानांनी खासदार शशी थरूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. नेहरूंमुळेच चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला असं थरूर म्हणाले होते. त्यावर टीका करताना मोदी म्हणाले, नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाला असं काँग्रेसचे लोक म्हणताहेत.

त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी फक्त पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नेमावं. असं केलं तरच नेहरूंनी खरी लोकशाही तत्व रूजवली असं मी मान्य करतो असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

एक चहावाला पंतप्रधान झाला हे अजुनही काँग्रेसला पचलेलं नाही. पहिले ते तुच्छतेनं म्हणायचे एक चहावाला पंतप्रधान झाला, आता ते म्हणतात की नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाला. चाडेचार वर्ष झाली तरी काँग्रेसचं रडगाणं अजुन संपलेलं नाही.

चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला याचं श्रेय मोदींचं नाही आणि भाजपचही नाही, ते यश हे लोकशाहीचं आहे असंही ते म्हणाले. छत्तिसगडमध्ये 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान असून या मतदानात जास्तित जास्त संख्येनं सहभाग नोंदवा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केलं.

 

'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'

First published: November 16, 2018, 4:05 PM IST

ताज्या बातम्या