शरद पवारांच्या व्हायरल VIDEO वर मोदींनाही हसू आवरलं नाही, भाषणातून केली सडकून टीका!

गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा व्यासपीठावर एका कार्यकर्त्याला हाताने मागे सारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 01:48 PM IST

शरद पवारांच्या व्हायरल VIDEO वर मोदींनाही हसू आवरलं नाही, भाषणातून केली सडकून टीका!

जळगाव, 13 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा पार पडली. या सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा व्यासपीठावर एका कार्यकर्त्याला हाताने मागे सारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचा उल्लेख आपल्या भाषणात करत मोदींनी पवारांवर टीका केली. जळगाव तसंच भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात साकोली विधानसभेत मोदींच्या पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका केली. तर यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्यांना निवडून द्या असं आवाहनही मोदींनी यावेळी जनतेला केलं. दरम्यान, याहीवेळेसही मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्यासपीठावर शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी त्यांना हार घालण्यात येत होता. त्यावेळी एका कार्यकर्त्या पुढे आला आणि त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. यावेळी पवारांनी हाताने मागे सारत या कार्यकर्त्याला बाजूला केलं. त्यावर नाव न घेता एवढ्या मोठ्या नेत्याला साधा कार्यकर्ता सहन झाला नाही. अशी टीका मोदींनी केली. ज्या पक्षाच्या अध्यक्षाला कार्यकर्ता नको आहे त्या पक्षाचं काय होणार असा टोला मोदींनी लगावला आहे.

Loading...

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- मी जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे

- फडणवीसांच्या नेतृत्वाला मद द्या

- जगभरात भारताचा गौरव होत आहे

- 4 महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल आभार

- संपूर्ण जगभरात भारताच्या लोकशाहीचा गौरव

- जनादेशामुळे भारताचा आवाज जगभरात ओळखला जातो.

- स्त्रीशक्तीचा जागर जगाने मानला

- 70 वर्षानंतर काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य

- सीमेपलीकडे होणारा दहशवाद संपवला

- मोदींकडून कलम 370 आणि काश्मीरचा उल्लेख

- काश्मीर भारताचं मस्तक आहे.

- गेली 5 वर्ष जनतेचा युतीवर विश्वास आहे

- कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद

- हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370बद्दल नमुद करा, विरोधकांना आव्हाहन

- मुल्सीम महिलांना मोठा दिलासा दिला

- तीन तलाक कायदा रद्द केला

- शरद पवारांवर मोदींची घणाघाती टीका

- शरद पवारांच्या व्हायरल व्हिडिओवर नरेंद्र मोदींची टीका

- काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...