साधूपासून सरदारपर्यंत- पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये असा दिसेल विवेक ओबेरॉय

साधूपासून सरदारपर्यंत- पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये असा दिसेल विवेक ओबेरॉय

या सिनेमात बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नीची अर्थात जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर झरीना वहाब मोदींच्या आईची हीराबेन यांची व्यक्तिरेखा वठवणार आहेत.

  • Share this:

मुंबई, १८ मार्च २०१९- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचं दिग्दर्न ओमंग कुमार यांनी केलं आहे. नुकतंच या सिनेमातील विवेक ओबेरॉयचे लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यात विवेकचे वेगवेगळे नऊ लूक दाखवण्यात आले आहेत. यात मोदींच्या तरुणपणापासून ते आतापर्यंतचे लूक दाखवण्यात आले आहेत. विवेकला मोदींप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बाकी सर्व गोष्टी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. सोशल मीडियावर काही अशाच पद्धतीच्या चर्चा आहेत. महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिक प्रदर्शनावेळीही दोघांच्या लूकची अशीच तुलना केली जात होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं होतं.

या सिनेमात बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नीची अर्थात जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर झरीना वहाब मोदींच्या आईची हीराबेन यांची व्यक्तिरेखा वठवणार आहेत. मनोज जोशी सिनेमात अमित शहा यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग यांनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली आहे. या सिनेमात मोदींच्या फक्त खासगी आयुष्याबद्दलच लोकांना सांगितले असे नसून एक कार्यकर्ता ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

First published: March 18, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading