PM MODI BIOPIC- या अभिनेत्री साकारणार आई आणि पत्नीची भूमिका

सिनेमाचा पहिला लूक जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सोशल मीडियावर विवेक ओबेरॉयची थट्टा उडवण्यात आली होती.

  • Share this:

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची लाट आली आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध खेळाडूंच्या आयुष्यावरील बायोपिकची निर्मिती केली जायची. मात्र काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमांची निर्मिती होऊ लागली आहे.

यात सर्वात चर्चेत सध्या कोणता बायोपिक असेल तर तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर तयार होणारा बायोपिक. यात विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे.

याआधी विवेकचा लूक समोर आला होता. आता यानंतर मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिक साकारणारी अभिनेत्री बरखा बिष्टचा पहिला लूक समोर आला आहे. हा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर सिनेमात मोदी यांच्या आईची म्हणजे हीराबेन मोदी यांची भूमिका जरीना वहाब यांनी साकारली आहे.

मोदी यांचे त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर मोदी सर्वात आधी आईला भेटले. मोदी आणि त्यांच्या आईच्या भेटीनंतर त्या चर्चेत आल्या होत्या. तसेच नोटबंदीदरम्यान, हीराबेन बँकेच्या रांगेत उभ्या राहून नोट बदलताना दिसल्या होत्या. आता जरीना वहाब त्यांची व्यक्तिरेखा कशा साकारतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मोदींच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट साकारणार  आहे. जसोदाबेन यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शिक्षिका म्हणून घालवले. असं म्हटलं जातं की, लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर मोदींनी पत्नीला सोडून संन्यास घेण्याचं ठरवलं.

या बायोपिकमध्ये मोदी यांचा फक्त राजकीय प्रवास दाखवण्यात येणार नसून अनेक खासगी घटनाही उलगडून सांगण्यात येणार आहेत. मोदी कशाप्रकारे चहा विकत पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले याचा आढावा या सिनेमात घेण्यात येणार आहे.

सिनेमाचा पहिला लूक जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सोशल मीडियावर विवेक ओबेरॉयची थट्टा उडवण्यात आली होती. विवेक ही व्यक्तीरेखा साकारू शकत नाही असंही अनेकांचं म्हणणं आहे.

सिनेमात मनोज जोशी अमित शहा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. जोशी यांचा पहिला लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती संदिप सिंह यांनी केली आहे. २३ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या