JIO CINEMA वर पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेला सिनेमा

JIO CINEMA वर पाहू शकता पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर तयार केलेला सिनेमा

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की, हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा.

  • Share this:

मुंबई, ११ एप्रिल- अभिनेता विवेक ओबेरॉय यांची मुख्य भूमिका असलेला पीएम नरेंद्र मोदी या सिनेमावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने यावर बंदी घालण्यास मनाई केली होती. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की, हा सिनेमा आचार संहितेचं उल्लंघन करतो की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा. यानंतर निवडणूक आयोगाने सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणुका होईपर्यंतच सिनेमावर बंदी घालण्यात आली असून निवडणुका झाल्यानंतर सिनेमाला प्रदर्शनाला नवीन तारीख देण्यात येईल.

अशावेळी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची थोडी निराशा झाली आहे. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित ‘मोदीः जर्नी ऑफ अ कॉमन मॅन’ ही सीरिज अजूनही पाहता येऊ शकते. ही सीरिज JIO CINEMA वरही उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरिजवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. बंदी घालण्यात आलेल्या सिनेमात विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ओमंग कुमारने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी लोकसभा निवडणुका होईपर्यंत या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी केली होती.

VIDEO: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सोनिया गांधींनी केलं होमहवन

First published: April 11, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading