चीनशी सलगी करणाऱ्या या देशाचा मोदी करणार पहिला दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये पहिली भेट मालदीवला देणार आहेत. गेल्या काही वर्षांत मालदीवची चीनशी सलगी वाढली होती. पण आता पुन्हा एकदा मालदीव आणि भारताचे संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पहिला दौरा आखला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 05:36 PM IST

चीनशी सलगी करणाऱ्या या देशाचा मोदी करणार पहिला दौरा

मालदीव हा सुमारे 1200 बेटांचा समूह आहे. हा देश हिंदी महासागरात वसला आहे. इथल्या 1200 बेटांपैकी 200 बेटांवर लोकवस्ती आहे तर 12 बेटं पर्यटकांसाठी सोयीसुविधा आहेत. दरवर्षी इथे सुमारे 6 लाख पर्यटक येतात.

मालदीवचं हिंदी महासागरात सामरिक महत्त्व आहे. भारतातल्या लक्षद्वीप बेटांपासून ही बेटं 700 किमी दूर आहेत. भारताचा 97 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार हिंदी महासागरातूनच होतो.

हिंदी महासागराच्या भागात 40 हून जास्त देश आहेत. जगातल्या लोकसंख्येपैकी 40 टक्के लोक या भागात राहतात. हिंदी महासागरात चीनने आपली लढाऊ जहाजं पाठवल्यानंतर मालदीवचं महत्त्व वाढलं.

Loading...

गेल्या काही वर्षात मालदीवची चीनशी जवळीक वाढली होती. चीन आणि मालदीवचं आर्थिक सहकार्य हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरला होता. चीनने मालदीवमध्ये 2011 मध्य दूतावास उघडला. भारताने मात्र 1972 मध्येच इथे दूतावास उघडला होता.

चीनने मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मालदीवमधल्या मोठमोठ्या प्रकल्पांना चीनने कर्जही दिली होती. आता मात्र मालदीवला भारताशी दोस्ती हवी आहे. त्यामुळे मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे.

चीनने मालदीवमधली 10 बेटं लीजवर घेतली आहेत. या बेटांवर चीनची जहाजं थांबतात. त्यासोबतच या बेटांचा चीनला चांगलाच फायदा होतो.

मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. भारतानेच पहिल्यांदा या देशाला मान्यता दिली. मालदीवमध्ये 25 हजार भारतीय राहतात. त्याचबरोबर भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही खूप मोठी आहे.

मालदीवमध्ये सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांत इथे धार्मिक कट्टरतावाद वाढीला लागला. इथे अनेक तरुण सीरियामध्ये जाऊन आयएस मध्ये भरती झाले. इस्लाम हाच मालदीवचा सरकारी धर्म आहे. त्यामुळे बिगरमुस्लीम व्यक्ती मालदीवचे नागरिक बनू शकत नाही.

मालदीवमध्ये सुन्नी मुस्लिमांची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांत इथे धार्मिक कट्टरतावाद वाढीला लागला. इथे अनेक तरुण सीरियामध्ये जाऊन आयएस मध्ये भरती झाले.
इस्लाम हाच मालदीवचा सरकारी धर्म आहे. त्यामुळे बिगरमुस्लीम व्यक्ती मालदीवचे नागरिक बनू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य मालदीव दौऱ्यात भारत आणि मालदीवचे संबंध सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...