लोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126

लोकसभेचा मोदींवर ‘विश्वास’, प्रस्तावाच्या विरोधात 325 मतं, बाजूनं 126

तब्बल 12 तास झालेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभेनं नरेंद्र मोदी सरकारविरूद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.20 जुलै : तब्बल 12 तास झालेल्या वादळी चर्चेनंतर लोकसभेनं नरेंद्र मोदी सरकारविरूद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळून लावला. ठरावाच्या बाजूने 126 मतं तर ठरावाच्या विरोधात 325 मतं पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास दिड तास भाषण करत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. राहुल गांधींच्या गळाभेटीलाही त्यांनी उत्तर देत खुर्चीवरून उठवण्याची एवढी घाई का झाली असा टोला हाणला. पंतप्रधानांच्या भाषणानंतर टीडीपीला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आवाजी मतदान घेतलं नंतर मतविभाजनाची मागणी झाल्यावर मतदान घेण्यात आलं. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे हे मतदान झालं आणि काही मिनिटांमध्ये त्याचा खुलासा झाला. ठरावाच्या बाजूने 126 तर विरोधात 325 मतं पडली. बीजेडी,टीआरएस यांनी चर्चेत सहभागच घेतला नाही तर शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

 

 

First published: July 20, 2018, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading