S M L

हवामान बदल आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं, मोदींचं आवाहन

जागतिक हवामान बदल आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं, असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत केलंय. या भाषणात पंतप्रधानांनी आजच्या घडीला जगासमोर असलेल्या आव्हानांचा आढावा घेतला.

Chandrakant Funde | Updated On: Jan 23, 2018 05:33 PM IST

हवामान बदल आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं, मोदींचं आवाहन

23 जानेवारी, दावोस : जागतिक हवामान बदल आणि दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावं, असं आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत केलंय. या भाषणात पंतप्रधानांनी आजच्या घडीला जगासमोर असलेल्या आव्हानांचा आढावा घेतला. पर्यावरणात होणारे बदल, दहशतवादात गुड आणि बॅड असा फरक करणं तसेच आत्मकेंद्रीत होणा-या जगापासून धोका असल्याचे मोदींनी सांगितले. 1997 साली एचडी देवेगौडा दावोसमध्ये येणारे भारताचे शेवटचे पंतप्रधान होते. त्यावेळी भारताचा जीडीपी 400 अब्ज डॉलर्सच्या आसपास होता. पण आता हाच जीडीपी सहापट जास्त झाल्याचंही मोदींनी यावेळी जगाला ठासून सांगितलं.

भारत सरकारने गेल्या साडे तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे दूरगामी परिवर्तन करणारे निर्णय घेतलेत. भारतात परकीय गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावं, यासाठी अनेक कायबाह्य कायदेही रद्द केल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. सबका साथ, सबका विकास हाच आमचा मंत्र आहे असंही मोदी म्हणाले.

आज आपण स्वत:च्या स्वार्थासाठी निर्सगाला हानी पोहोचवत आहोत. हा विकास आहे का ? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. वातावरण बदलाचं आज मानवतेसमोर सर्वात मोठं आव्हान आहे, त्यामुळे जगाने आत्मकेंद्रीतपणा सोडून मानवाच्या कल्याणासाठी एकत्र येण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. जगासमोर सध्या शांतता, स्थिरता आणि सुरक्षा ही प्रमुख आव्हानं आहेत. भारतीयांचा तोडण्यावर नव्हे जोडण्यावर विश्वास असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 05:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close