...आणि पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं !

...आणि पंतप्रधान मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं !

संसदेवरच्या हल्ल्याला आज १६ वर्षं झाली.यानिमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. याच कार्यक्रमात सत्ताधारी नेत्यांनी आणि विरोधी नेते आवर्जून विचारसूस केली. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हातात हात घेऊन विचारपूस केली.

  • Share this:

13 डिसेंबर, नवी दिल्ली : संसदेवरच्या हल्ल्याला आज १६ वर्षं झाली.यानिमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली. याच कार्यक्रमात सत्ताधारी नेत्यांनी आणि विरोधी नेते आवर्जून विचारसूस केली. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हातात हात घेऊन विचारपूस केली. गुजरात निवडणुकीत पंतप्रधानांनी मनमोहन सिंह यांच्यावर थेट पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केल्याने ते चांगलेच दुखावले गेले होते. या आरोपांबद्दल पंतप्रधान माफी मागतील अशी अपेक्षाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवरच या दोन आजी माजी पंतप्रधानांमधली आजची हस्तांदोलन भेट नक्कीच सुखद धक्का देणारी होती.

पंतप्रधान मोदींचं संसद भवनात आगमन झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं. एरवी एकमेकांवर कडाडून टीका करणाऱ्या राजकीय नेत्यांचं वेगळं रुप नक्कीच सुखावणारं होतं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज देखील स्वतःहून डॉ. मनमोहन सिंग यांची विचारपूस करण्यासाठी गेल्या. सोनिया गांधीही तिथे होत्या. सुषमांनी त्यांनाही नमस्कार केला.. तिघंही बराच वेळ बोलत उभे होते. पंतप्रधान मोदी आल्यावर त्यांनी बोलणं थांबवलं, पण त्यानंतर अडवाणीची येताच राहुल गांधी स्वतःहून त्यांना घेण्यासाठी पुढे आले. नंतर हे सर्वपक्षीय नेते सोबतच शहिदांना आजरांजली वाहण्यासाठी शांत उभे राहिले.

पंतप्रधान मोदी यांचं आगमन होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मस्त गप्पा सुरू होत्या. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी राहुल यांचं अभिनंदन केलं. बराच वेळ दोघं गप्पा मारत होते. सुषमा स्वराज आणि राहुल गांधींच्या गप्पा सुरू असताना कायदेमंत्री रविशंकर प्रसाद आले, आणि मोठ्या उत्साहाने राहुल यांचं अभिनंदल केलं. दोघांमध्ये छान गप्पागोष्टी रंगल्या होत्या.

शरद पवारांनी काल नागपुरात बोलताना माजी पंतप्रधानांवर टीका केल्याबद्दल सत्ताधाऱ्यांना चांगलंच खडसावलं होतं. अशा प्रकारचे आरोप करताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना लक्ष केलं होतं, कदाचित त्याचाच परिणाम म्हणून तर मोदींनी मनमोहन सिंग यांची स्वतःहून विचारपूस केली असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

First published: December 13, 2017, 2:58 PM IST

ताज्या बातम्या