'सबका साथ, सबका विकास'चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2017 05:03 PM IST

'सबका साथ, सबका विकास'चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन

16  एप्रिल :  नवी दिल्ली – `सबका साथ, सबका विकास` या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 एप्रिल रोजी दिल्लीत झालं. या पुस्तकात पंतप्रधानांच्या 28 भाषणांचा आणि 14 ‘मन की बात’च्या संवादांचा मराठीत अनुवाद केला आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशननं हे पुस्तक प्रसिद्ध केलंय. आयबीएन-लोकमतचे पत्रकार अजय कौटिकवार आणि अमित मोडक यांनी या पुस्तकाचं संपादन आणि अनुवाद केलाय.

संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात झालेल्या एका खास कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तकं, चर्चा, परिसंवाद यांची महाराष्ट्रात मोठी परंपरा असून असे उपक्रम महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात. हे पुस्तक संदर्भासाठी सर्वांनाच उपयोगी येईल असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जोपर्यंत सरकारमध्ये लोकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यंत कुठलीच योजना यशस्वी होऊ शकत नाही. सरकारचं यश हे जनतेच्या सहभागावरच अवलंबून असते असंही ते म्हणाले.

या पुस्तकात सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासन, पर्यावरण, शेती, साहित्य अशा विविध विषयांवरची पंतप्रधानांची अभ्यासपूर्ण भाषणं घेण्यात आली आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...