'सबका साथ सबका विकास' हाच विजयाचा मंत्र- मोदी

गुजरातमध्ये विरोधकांनी विकासाची चेष्टा केली. आणि जातीयवादाचं विष पेरण्याचा प्रयत्न केला पण गुजराती जनतेनं मतपेटीतून पुन्हा विकासालाच निवडून दिलं, ही खूप मोठी घटना आहे. गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजप सत्तेवर येणं ही माझ्यासाठी असामान्य घटना आहे. मी गुजराती जनतेचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी गुजराती मतदारांचे आभार मानले.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 07:27 PM IST

'सबका साथ सबका विकास' हाच विजयाचा मंत्र- मोदी

18 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरातमध्ये विरोधकांनी विकासाची चेष्टा केली. आणि जातीयवादाचं विष पेरण्याचा प्रयत्न केला पण गुजराती जनतेनं मतपेटीतून पुन्हा विकासालाच निवडून दिलं, ही खूप मोठी घटना आहे. गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजप सत्तेवर येणं ही माझ्यासाठी असामान्य घटना आहे. मी गुजराती जनतेचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी गुजराती मतदारांचे आभार मानले.

हिमाचल प्रदेशच्या जनतेनं काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारला नाकारल्याबद्दल तिथल्या जनतेचेही मोदींनी आभार मानले. गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज नवीदिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या नेत्यांनी विजयोत्सव साजरा केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, ''गुजरातमध्ये भाजपची हार व्हावी, यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडलं, विकासाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला. जातीयवादावा खतपाणी घातलं पण अखेर गुजराती जनतेनं विकासालाच निवडलं, गुजरातमधील भाजपचा सलग पाचवा विजय ही माझ्यासाठी ऐतिहासिक घटना आहे. गुजरातमधला हा विजय म्हणजे, रिफॉर्म आणि परफॉर्मला मिळालेला जनतेचा कौल आहे. मध्यमवर्गाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या आम्ही पूर्ण करणारच, सबका साथ सबका विकास हाच भाजपचा विजयाचा मंत्र आहे. गुजराती जनतेनं विकासाला निवडलं असलं तरी, राज्यात पुन्हा जातीवादाचं विष पेरलं जाऊ नये, यासाठी भविष्यातही आणखी जागृत राहण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर भारताला फक्त विकासच पुढे नेऊ शकतो. त्यामुळे भाजप यापुढेही फक्त विकासाच्या मार्गानेच पुढे जाईल.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...