थोडासा GDP घसरला म्हणजे काहींना आकाश कोसळल्यासारखं वाटतंय- पंतप्रधान

थोडासा GDP घसरला म्हणजे काहींना आकाश कोसळल्यासारखं वाटतंय- पंतप्रधान

देशाच्या घसरत्या आर्थिक स्थितीवरून टीकेची झोड उठवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. काही महिन्यांमध्ये GDP थोडा घसरला म्हणजे आकाश कोसळलं असं काही लोकांना वाटतं, ते साफ चूक आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय

  • Share this:

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : देशाच्या घसरत्या आर्थिक स्थितीवरून टीकेची झोड उठवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. काही महिन्यांमध्ये GDP थोडा घसरला म्हणजे आकाश कोसळलं असं काही लोकांना वाटतं, ते साफ चूक आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे, मागच्या सरकारमध्ये अशी स्थिती तब्बल 7 वेळा आली होती, विकासदरही अनेकदा खालच्या पातळीवर आला होता. तसंच युपीए सरकारच्या काळात आणि गेल्या तीन वर्षात एकाच मापाने जीडीपी मोजण्यात आलाय. त्यामुळे देशवासियांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

नवी दिल्लीत सीएची राष्ट्रीय परिषद भरवण्यात आलंय. त्यात पंतप्रधानांनी प्रथमच देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा जगासमोर मांडला. युपीएच्या काळात 10च्या असणारा महागाई निर्देशांक आज 2.5 वर आल्याचा दावा पंतप्रधानांनी केलाय. वित्तीय तुटीचं प्रमाणही कमी झाल्याचं मोदींनी म्हटलंय. केंद्र सरकारची विदेशी गंगाजळी 40 हजार कोटी डॉलरच्या वर गेलीय. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. तसंच देशाचा आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलतंय.

सुरूवातीच्या काळात जीएसटीमध्ये काही काही अडचणी आल्या असतील तर त्या दुरूस्त केल्या जातील, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. शहरी भागात वाहनांची विक्री वाढलीय तर ग्रामीण भागात ट्रॅक्टरची 34 टक्के विक्री वाढली, ही वाढ म्हणजे देशातून मागणीत वाढ झाल्याचे संकेत आहेत, गेल्या तीन वर्षात 1 लाख कोटीपेक्षा जास्त रूपयांच्या प्रकल्पांना मंजूरी मिळालीय. त्यामुळे रोजगारवाढीसाठी नक्कीच या प्रकल्पांचा फायदा होणार आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

First published: October 4, 2017, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading