'या चौकीदारानं देशाची राखणदारी केली आहे', मोदींची राहुल गांधींवर टीका

'या चौकीदारानं देशाची राखणदारी केली आहे', मोदींची राहुल गांधींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात दाखल.. मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

सोलापूर, 09 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. विविध कामांच्या उद्घाटनासाठी ते सोलापुरात दाखल झाले आहेत. नेहमीप्रमाणे यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. सोलापूरकरांनी आशीर्वाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- विठ्ठल रुक्मिणीला मोदींचं नमन

- या चौकीदारानं राखणदारी केलेली आहे

- आम्ही गाजावाज न करता गरीबांच्या खात्यात तीन हजार कोटी रुपये पोहोचवलेत

- पूर्वी दलाल हे सगळा पैसा खात असत आ़ज ही सगळी दलाली बंद झालेली आहे

- 2004 ते 2014 दिल्लीत रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार होतं - मोदींचा कॉंग्रेसवर हल्ला

- केवळ भूमीपूजन करायचे आणि मागे वळूनही पहायचे नाही ही आमची संस्कृती नाही

- भूमीपूजन आम्ही केलंय घरांच्या चाव्या देण्यासाठीही आम्हीच येणार

- देशाच्या पूर्व भागातला विकास खुंटला तो यापूर्वीच्या राज्यकर्त्यांमुळे

- आपली शहर आर्थिक उलाढालींचीं केंद्र

- आमच्या सरकारनं समस्यावंर शाश्वत उपाय शोधले

- प्रत्येक घरात वीज पोहचवण्याचं काम केल्याबद्दल फडणवीस सरकारचे कौतुक

- सरकारने १ हजार कोटींच्या सोलापूर तुळजापूर रेल्वेला मंजुरी दिली

- देशाला शुभेच्छा...सर्वांना १० टक्के आरक्षणाला मंजुरी मिळाली आहे.

-  पण काही लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. आरक्षणाला काहींनी विरोध केला तरीही मंजूर केला. आज राज्यसभेत मांडला जाणार आहे.

- दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.

- सबका साथ सबका विकास ही आमची संस्कृती

- मतांच्या राजकारणासाठी जातीचं राजकारण

- राज्यसभेतही आज हे विधेयक मंजूर होईल हा विश्वास

- अतिरिक्त 10 टक्के आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

- भाजप जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटीबद्ध

- आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही

- लाखो कुटुंबांना आरक्षणाचा लाभ

- काही लोकांना राजकारणाशिवाय बाकी काही सुचत नाही

- या लोकांकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाची खिल्ली उडवली गेली

- आमचं सरकार एका नवीन विचारासह काम करत आहे

- आम्ही एकट्या सोलापुरात तीस हजार घरं बांधली

- आम्ही केवळ गरीबांचाच नाही तर मध्यमवर्गाचाही विचार करतो

मुख्यमंत्र्यांकडून मोदींचं स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं पगडी घालून स्वागत केलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 30 हजार घराच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दौऱ्यावेळी युतीच्या चर्चेविषयी मोदींना माहिती दिली जाणार आहे. तसंच भाजपच्या लोकसभा तयारीचीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील. भाजपची स्वबळाची तयारी आणि उमेदवाराची माहिती याविषयी पंतप्रधानांशी चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा सोलापूर दौरा?

सोलापूर दौऱ्यावेळी मोदींच्या हस्ते 30 हजार घराच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्टसिटी अंतर्गत झालेल्या विकास कामांचं उद्घाटन होणार आहे.

इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे. यासाठी सोलापुरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

सोलापुरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा सोलापुरात तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी 1 लाख लोक बसू शकतील अशी सोय इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर भाजपतर्फे करण्यात आली आहे.

VIDEO : पंकजा मुंडेंनी निर्धाराची 'पायरी' ओलांडली?

First published: January 9, 2019, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading