पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 15 टक्के वाढ !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत 15 टक्के वाढ !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरात 15 टक्क्यांची वाढ झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरात 15 टक्क्यांची वाढ झालीय. 2016 -17 या आर्थिक वर्षातील पंतप्रधानांची संपत्ती 2 कोटींपेक्षा जास्त आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 2014-15 नरेंद्र मोदींनी आपली निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 1.41 कोटी इतकी दाखवली होती. त्यानंतर गेल्या वर्षी त्यामध्ये 1.73 इतकी वाढ झाल्याचं बघायला मिळालं तर चालू वर्षी हीच संपत्ती 2 कोटींच्यावर पोहोचली आहे.

पंतप्रधानांच्या स्थावर मालमत्तेत फारसी वाढ झाली नसली तरी त्यांच्याकडची रोकड तब्बल 66 टक्क्यांनी वाढलीय. पूर्वी त्यांच्याकडे 89 हजार 700 रुपयांची रोकड होती ती आता 1 लाख 49 हजार 700 रुपयांपर्यंत वाढलीय. पंतप्रधानांकडे 45 ग्राम वजनाच्या सोन्याच्या 4 अंगठ्याही आहेत. बाजारभावानुसार त्याची किंमत 1 लाख 28 हजार इतकी आहे. गांधीनगरच्या स्टेट बँकेत पंतप्रधानांचं बचत खातं असून त्यावर 1 लाख 33 रुपये जमा आहेत तर स्टेट बँकेच्याच दुसऱ्या शाखेत 90.26 लाखांची मुदत ठेव दाखवण्यात आलीय. याशिवाय एलआयसी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमधून पंतप्रधानांनी 5.75लाखांची बचतही केलीय. मोदींच्या गांधीनगरमधील घराच्या किंमतीत मात्र, कुठलीही वाढ झालेली नाही. त्याची किंमत त्यांनी 1 करोड इतकी दाखवण्यात आलीय.

मोदींकडे स्वतःच्या मालकीचं कोणतही चारचाकी वाहन नाहीये. तसंच ते कोणत्याच प्रकारच्या वडलोपार्जित संपत्तीचे वारसदारही बनलेले नाहीत. पंतप्रधानांची पत्नी जशोदाबेन यांच्या नावापुढील संपत्ती या कॉलममध्ये मात्र, माहित नाही असं लिहिण्यात आलंय. पंतप्रधानांची पत्ती जसोदाबेन या त्यांच्यासोबत राहत नसल्याने कदाचित त्यांच्या संपत्तीचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केला नसावा. केंद्रीय गृह खात्याच्या आदेशानुसार सर्व मंत्र्यांना 31ऑगस्टपर्यंत आपली संपत्ती जाहीर करणं बंधनकारक होतं. त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची यावर्षीची संपत्ती जाहीर केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading