Home /News /news /

Ground Report : केजरीवाल यांच्या प्रचारतंत्र पुढे भाजपचे नेते हतबल

Ground Report : केजरीवाल यांच्या प्रचारतंत्र पुढे भाजपचे नेते हतबल

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जवळपास 400 पेक्षा जास्त नेते दिल्ली्ली विधानसभेसाठी प्रचार करीत आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचार सभा मध्ये सहभागी होऊन मत मागित आहे

    प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 3 फेब्रुवारी: राजधानीचा विकास करायचा असेल तर भाजपच्या हाती दिल्लीची सत्ता द्या. भाजपाला दिलेल्या प्रत्येक मतामुळे दिल्लीचा विकास होणार आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक दिल्लीचं भविष्य निश्चित करणार असून मी देश बदलला आहे आता दिल्ली बदलण्याची वेळ आली आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या प्रचारसभेत केले. राजधानी दिल्लीतील शाहदरा परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी मोदी यांनी प्रचार सभा घेतली. जवळपास 26 विधानसभा उमेदवारांसाठी घेतलेल्यााा प्रचार सभेत वर्तमान केजरीवाल सरकारवर जोरदार आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीला विकासापासून रोखण्याचे कारस्थान वर्तमान सरकारांनीी रचले. दिल्लीचा विकास करायचा असेल तर भाजपला सत्ता दिल्या शिवाय पर्याय नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. भारतीय जनता पक्षाने जी आश्वासने निवडणुकीत दिली आहे ती शंभर टक्के पूर्ण असेही मोदींनी सांगितले. वर्तमान केजरीवाल सरकार ही राजकारणासाठी माणुसकी विसरलेली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आम्हालाा जेवढी दिल्लीला मदत करता येईल तेवढी आम्ही करीत आहोत मात्रर वर्तमान सरकार केंद्रर सरकारची कुठलीही योजनाा लागू करण्यासाठी तयार नाही असेही त्यांनी सांगितले. VIDEO : 300 रुपयांसाठी आलेला भाजपचा समर्थक काय म्हणतोय पाहा... येत्या आठ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून यामध्ये दिल्लीकरांनी भाजपला मतदान करावे असे आवाहन करताना मोदी म्हणाले, 'यावेळी निश्चितपणे भाजपचे सरकार येईल. त्यामुळे दिल्लीकरांना आरोग्य सुविधाा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सोबतच घरापासून वंचित असणाऱ्या दिल्लीतील जनतेला स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा दिल्लीत भाजपची सत्ता असेल. देश बदलला आहे आता दिल्ली बदलण्याची वेळ आली आहे.' दिल्ली विधानसभेमध्ये यावेळी जोरदार टक्कर भारतीय जनता पक्ष केजरीवाला देत आहे मात्र गेल्या वेळची निवडणूक बघता यावेळी देखील केजरीवाल हे सत्ता काबीज करतील अशी चिन्हं आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने जवळपास 400 पेक्षा जास्त नेते दिल्ली्ली विधानसभेसाठी प्रचार करीत आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचार सभा मध्ये सहभागी होऊन मत मागित आहे. मात्र केजरीवाल यांच्या प्रचारतंत्र पुढे भाजपचे नेते हतबल झाले आहे, असंच चित्र आहे. परीक्षेपूर्वीच्या घटनेनं महाराष्ट्र सुन्न, 12वीच्या मुलानं वर्गातच संपवलं आयुष्य
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Delhi election

    पुढील बातम्या