200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार; निवासस्थानी नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक

200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार; निवासस्थानी नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. बैठकीमध्ये अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण देखील हजर आहेत.

  • Share this:

दिल्ली, 26 फेब्रुवारी : पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय वायु दलानं दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायु दलाला हल्ल्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या 12 विमानांनी दहशतवाद्यांवर हल्ला करत खात्मा केला. यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले.

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. बैठकीमध्ये अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण देखील हजर आहेत.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली असून लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार दिले होते. भारतीय वायु दलानं केलेली कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झालं.

Air Strike नंतर काय म्हणाले राहुल गांधी?

भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर 'भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम' असं ट्विट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं.

पाकचे 5 सैनिक ठार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासोबत पाकिस्तानचे 5 सैनिकही ठार झाले.


VIDEO: शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरपत्नीनं घेतला 'हा' निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या