‘पब्लिक डिमांड’वर आता या तारखेला रिलीज होणार पंतप्रधान मोदींचा बायोपिक

‘पब्लिक डिमांड’वर आता या तारखेला रिलीज होणार पंतप्रधान मोदींचा बायोपिक

सिनेमात मोदी यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली.

  • Share this:

मुंबई, २० मार्च- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या सिनेमाचा दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं. सिनेमात मोदी यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली. आधी हा सिनेमा १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा एक आठवडा आधी अर्थात ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाचे निर्माते संदीप एस सिंग म्हणाले की, ‘आम्ही चाहत्यांच्या मागणीवर हा सिनेमा एक आठवडा आधी प्रदर्शित करत आहोत. या सिनेमासाठी लोकांमध्ये फार प्रेम आणि अपेक्षा आहेत. त्यामुळेच आम्ही लोकांना फार वाट पाहायला नाही लावणार. ही १.३ अब्ज लोकांची गोष्ट आहे आणि त्यांना त्यांची गोष्ट दाखवण्यासाठी मी फार थांबू शकत नाही.’

हा सिनेमा तमिळ, तेलहू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दुसरं पोस्टर १८ मार्चला प्रदर्शित होणार होतं. पण, १७ मार्चला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या निधनामुळे पोस्टर रिलीजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा हे सिनेमाचं दुसरं पोस्टर प्रदर्शित करणार होते. मात्र कार्यक्रम रद्द केल्याने आता हे पोस्टर सोशल मीडियावरच प्रदर्शित करण्यात आलं. दोन्ही पोस्टर नंतर आता प्रेक्षकांना सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकत लागून राहिली आहे.

VIDEO : रणजित तर आले विजयसिंह मोहितेंचं काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

First published: March 20, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading