'विरुष्का'च्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती !

'विरुष्का'च्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती !

विराट - अनुष्काच्या लग्नाचा स्वागत समारंभ आज दिल्लीत मोठ्या थाटात संपन्न झाला... या स्वागत समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आजच्या स्वागत समारंभात विराटने ब्लॅक शेरवानी तर अनुष्काने लाल बनारसी साडी परिधान केली होती.

  • Share this:

21 डिसेंबर, नवी दिल्ली : विराट - अनुष्काच्या लग्नाचा स्वागत समारंभ आज दिल्लीत मोठ्या थाटात संपन्न झाला... या स्वागत समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. 11 डिसेंबरला विराट आणि अनुष्काचं इटलीच्या टस्कनीत लग्न झालं. काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता.

 

लग्नानंतर विराट आणि अनुष्कानं आपल्या मित्र परिवारांसाठी नवी दिल्लीत आज स्वागत समारंभाचं आयोजन केलंय. दिल्लीतल्या ताज डिप्लोमॅटिक अॅनक्लेवच्या दरबार हॉलमध्ये हा स्वागत समारंभ पार पडला. विराट हा मुळचा दिल्लीचा आहे. अंडर 17 पासून तिथे क्रिकेट खेळतोय. तेव्हापासूनचे सगळे क्रिकेटर या रिसेप्शनला उपस्थित होते. विराट-अनुष्काच्या कुटुंबातले सर्व नातेवाईकही या रिसेप्शनला हजर होते. टीम इंडिया मात्र श्रीलंकेसोबत खेळतेय. त्यामुळे हे सर्वजन 26 तारखेला मुंबई होणाऱ्या रिसेप्शनला हजर राहतील.

दरम्यान, आजच्या स्वागत समारंभात विराटने ब्लॅक शेरवानी तर अनुष्काने लाल बनारसी साडी परिधान केली होती. या स्वागत समारंभाचं फोटोशूट करण्यासाठी खास मुंबईवरून टॉपचे 10 फोटोग्राफर्स बोलावण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 11:05 PM IST

ताज्या बातम्या