जगावर प्रभाव टाकणाऱ्या दिग्गजांना पंतप्रधानांनी सांगितलं भारताचं 'स्वप्न'

2007 नंतर तब्बल 12 वर्षांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक जेपी मॉर्गनने भारतात आयोजित केली होती.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जेपी मॉर्गन या जगविख्यात कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्सिलच्या सदस्यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली आणि त्यांना भारताच्या आर्थिक स्थिती आणि स्वप्नांबद्दल माहिती दिली.

जेपी मॉर्गनच्या या सदस्यांमध्ये जगभरातल्या अनेक दिग्गजांचा समावेश होता. यात अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर, कोंडालीसा राईस, रॉबर्ट गेट्स, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड आणि टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा उपस्थित होते.

2007 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक भारतात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अनेक बडे उद्योगपतीही उपस्थित होते. या सगळ्या दिग्गजांशी पंतप्रधानांची उत्तम केमेस्ट्री दिसून आली.

या सगळ्या मान्यवारांच्या बैठकीलाही पंतप्रधानांनी संबोधीत केलं. त्यानंतर आपल्या निवासस्थानी त्यांनी सर्व दिग्गज नेते आणि मान्यवरांशी अनौपचारिक संवाद साधला.

या सर्व मान्यवरांशी बोलताना पंतप्रधानांनी त्यांचं स्वप्न आणि महात्माकांक्षा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलही भाष्य केलं. 2024 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 11:13 PM IST

ताज्या बातम्या