पंजाब, 21 आॅगस्ट : मी पाकिस्तानला गेलो यावरून वाद होतोय. पण याआधी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दोस्ती बस घेऊन लाहोरला गेले होते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीही नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी अचानक गेले होते मग मी गेलो यात काय चुकलं ?, असा सवाल उपस्थितीत करत पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिध्दू यांनी आपली बाजू मांडली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात लष्करप्रमुख कमार बाजवा यांना दोनदा मिठी मारण्यावरून नवज्योत सिंग सिध्दूंवर सडकून टीका झाली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन सिद्धू यांनी स्पष्टीकरण दिलं. जर तिथल्या लष्करप्रमुखांनी माझ्याशी हात मिळवला, मला मिठी मारली, तर मी पाठ फिरवून निघून जाणं अपेक्षित होतं का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. वाजपेयी लाहोरला गेले होते, मोदीही शरीफ यांना भेटायला गेले होते. मग त्यांच्यावरही टीका करणार का, असंही ते म्हणाले.
मला 10 वेळा शपथविधीसाठी आमंत्रण मिळाले. त्यानंतर मी केंद्र सरकारकडे याबद्दल परवानगी मागितली होती. मला पाकिस्तान सरकारने व्हिजा दिल्यानंतर दोन दिवसांनी खुद्द सुषमा स्वराज यांनी फोन करून जाण्यास परवानगी दिली होती अशी माहितीही सिध्दू यांनी दिली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिध्दूंच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचे अनेके नेते या प्रकारणी अमरिंदर सिंह यांच्याशी बोलले आहे. पण आपण लोकशाहीत वावरतो इथं प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे असंही सिध्दू म्हणाले.
पाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल
दरम्यान, नवज्योत सिंग सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.
VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा